आता तिरुपतीच्या धर्तीवर होणार पंढरपुरातील गर्दीचे नियोजन

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच इतर राज्यातून दररोज मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. येणाऱ्या भाविकांना अधिकच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी तिरुपती बालाजी देवस्थानकडून भाविकांना देण्यात येणाऱ्या विविध सुविधांची पाहणी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या शिष्टमंडळाकडून करण्यात आली.

(हेही वाचा – Forbes Rich List: जगातील श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी दुसऱ्या स्थानी)

तिरुपती बालाजी देवस्थान येथे दर्शनासाठी दररोज लाखो भाविक येतात. येणाऱ्या भाविकांना तिरुपती देवस्थानाकडून देण्यात येणाऱ्या सुविधांची प्रत्यक्ष पाहणी व माहिती शिष्टमंडळाने घेतली. यामध्ये दर्शन रांग व्यवस्था व दर्शन रांगेत देण्यात येणाऱ्या सुविधा, गर्दीच्यावेळी करण्यात येणारे नियोजन, भाविकांच्या सुरक्षेसाठी उपलब्ध यंत्रणा, वैद्यकीय सुविधा, वाहतूक नियोजन, वाहन व्यवस्था, वाहनतळ व्यवस्था, भोजन व्यवस्था, स्वच्छता, दर्शन व्यवस्था आदी विविध सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. याबाबतची माहिती देवस्थानच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासमवेत जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, जिल्हा प्रशासन अधिकारी आशिष लोकरे, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अरविंद माळी उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here