आज गुरु-शिष्य परंपरा लोप पावत आहे. अशा परिस्थितीत ही परंपरा जपली सुप्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित चित्रेश दास यांनी. चित्रेश दास (Pandit Chitresh Das) यांना त्यांचे गुरु राम नारायण मिस्र यांनी प्रशिक्षण दिले होते. त्यानंतर दास यांनी आपल्या शिष्यांना प्रशिक्षण प्रदान करण्यास सुरुवात केली. भारत आणि यूएस मध्येही त्यांचे शिष्य आहेत.
पंडित चित्रेश दास (Pandit Chitresh Das) यांचा जन्म ९ नोव्हेंबर १९४४ रोजी कोलकोता येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव नित्याचार्य प्रोल्हाद दास आणि आईचे नाव निलिमा दास होते. त्यांच्या पालकांनी ’नृत्य भारती’ ही भारतातील पहिली नृत्य संस्था स्थापन केली. प्रोल्हाद दास हे नृत्यशास्त्रातले तज्ञ आणि नृत्य दिग्दर्शक होते. चित्रेश दास यांना वडिलांकडूनच नृत्याचा वारसा मिळाला.
(हेही वाचा Firecrackers Stock Seized : सावरकर मंडईसह दादरमधून लाखो रुपयांच्या फटाक्यांचा साठा जप्त)
चित्रे दास हे उत्तर भारतीय सैलीचे एक शास्त्रीय नर्तक होते. तसेच नृत्य दिग्दर्शक संगीतकार आणि प्रशिक्षकही होते. कथ्थक नृत्यातील त्यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे हा नृत्य प्रकार त्यांनी अमेरिकेत प्रसिद्ध केला. १९७९ मध्ये त्यांनी कॅलिफोर्नियामध्ये चंदम स्कूल आणि चित्रेस दास डान्स कंपनीची स्थापना केली. २००२ मध्ये त्यांनी भारतीय छंदम न्रुत्य भारतीची स्थापना केली. विशेष म्हणजे आज जगभरात या चंदम संस्थेच्या दहापेक्षा जास्त शाखा आहेत.
त्यांचे फुटवर्क तर कमाल होते. नृत्य सादर करताना त्यांची लयबद्धता संमोहित करणारी होती. दास हे लहानपणापासून नृत्य सादर करत आले आहेत. ११ व्या वर्षीच त्यांनी तबलावादक समता प्रसादजी आणि नृत्य सम्राट उदय शंकर यांच्या सोबत कार्यक्रम केला होता. त्यांनी कोलकोता येथील रबिंद्र भारती युनिव्हर्सिटीमधून पदवी प्राप्त केली आणि अल्हाबादमधील प्रयाग संगीत समितीतून त्यांनी नृत्य शास्त्रात एम.ए. ही पदवी प्राप्त केली.
चित्रेश दास (Pandit Chitresh Das) हे मातृभक्त होते. ते नेहमी म्हणायचे की आई ही पहिली गुरु असते. चित्रेश दास यांच्या प्रयत्नामुळेच आज कथ्थक नृत्य विदेशातही पोहोचले आहे.
Join Our WhatsApp Community