मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पांडुरंगाची महापूजा; १२ लाखांहून अधिक वैष्णवांची मांदियाळी

या शासकीय महापूजेवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.

250
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पांडुरंगाची महापूजा; १२ लाखांहून अधिक वैष्णवांची मांदियाळी

संपूर्ण महाराष्ट्र आज म्हणजेच गुरुवार २९ जून रोजी देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी साजरी करत आहे. यानिमित्त पंढरपुरात वैष्णवांचा मेळा भरला आहे. या आषाढी वारीनिमित्त परंपरेनुसार राज्याचे मुख्यमंत्री विठुरायाची पूजा करतात. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा केली. यावर्षी मानाचे वारकरी म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वाकडी गावातील भाउसाहेब मोहनीराज काळे आणि मंगल भाऊसाहेब काळे या शेतकरी दाम्पत्याला पुजेचा मान मिळाला.

बळीराजा कष्टकऱ्याला चांगले दिवस येऊ दे

यावेळी मोठ्या उत्साहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक विठ्ठल रक्मिणीची शासकीय महापुजा केली. यावेळी त्यांनी बळीराजाला आणि कष्टकऱ्याला चांगले दिवस येऊ दे .. सुजलाम सुफलाम होऊ दे .. पाऊस पडू दे .. प्रत्येक राज्यातल्या माणसाला चांगले दिवस यावेत अशी विठुरायाच्या चरणी प्रार्थना केली. तसेच मंदिरातील कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार महागाई आणि घर भत्ता मंजूर करण्याची घोषणा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

या शासकीय महापूजेवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री सुरेश ख्याडे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, मंत्री दादा भुसे, खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे सीइओ दिलीप स्वामी, देवस्थान समितीचे सह अध्यक्ष गहिणीनाथ महाराज औसेकर महाराज यांच्यासह जिल्ह्यातील खासदार, आमदार अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

(हेही वाचा – ‘युवा’ खेळाडू सुधारित ‘जीआर’च्या प्रतिक्षेत, शासन निर्णयातील घोळामुळे मनस्ताप)

पहाटे तीनच्या सुमारास झाली शासकीय महापूजा

गेल्या महिन्याभरापासून पंढरीच्या विठुरायाला भेटण्यासाठी आतुर झालेला वारकऱ्यांचा मेळा पंढरपुरात दाखल झाला आणि अवघी पंढरी विठ्ठल-रखुमाईच्या नावाने दुमदुमून गेली. लाखोंच्या संख्येनं भाविक पंढरपुरात पांडुरंगाच्या चरणी लीन झाले. या भक्तीरसात न्हाऊन निघालेल्या पंढरपूरच्या मंदिरात पहाटे तीनच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक शासकीय महापूजा केली.

शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी १०८ कोटी रुपये मंजूर

पंढरपूर मंदिराच्या विकास आराखड्याबाबत सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेण्यात येणार नाही असे मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले. तसेच पंढरपूरातील विठ्ठल रुक्मिणी मंदीरातील कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवून त्यांना दिलासा देण्यात आला असल्याचे यावेळी बोलताना सांगितले. तसेच पंढरपूर शहरातील प्रलंबित पाणीपुरवठा योजनेसाठी १०९ कोटी तर शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी १०८ कोटी रुपये मंजूर केल्याचे यावेळी जाहीर केले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.