परमबीर यांचा अजून एक धक्का…

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय घडामोडींना एकामागून एक हादरे बसत आहेत. त्यात आता आणखी एका गोष्टीची भर पडली आहे. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत गृहमंत्र्यांवर आरोप करणा-या माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी आता अजून एक धक्का दिला आहे.

थेट सर्वोच्च न्यायालयात धाव

परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहीलेल्या पत्राची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात आता एक नवा ट्विस्ट आला आहे. या पत्रात त्यांनी थेट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करत, देशमुख यांनी सचिन वाझे यांना बोलावून १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले असल्याचा गौप्यस्फोट केला होता. या याचिकेवर आता २६ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

(हेही वाचाः देशमुखांची विकेट पडणार, दिलीप वळसे-पाटील गृहमंत्री होणार?)

(हेही वाचाः देशमुखांच्या राजीनाम्यावर नवाब मलिक यांची प्रतिक्रिया! म्हणाले…)

कोणाकडूनही चौकशी नाही

गृहमंत्र्यांनी चौकशी झाल्याचे कारण देत आपल्याला मुंबई आयुक्त पदावरुन पायउतार केल्याचे सांगितले होते. पण
मला कोणीही चौकशीसाठी बोलावले नाही. माझी कुठल्याही प्रकारची चौकशी एटीएस किंवा एनआयएकडून झालेली नाही. त्यामुळे आपण गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची आणि आपल्या बदली मागच्या कारणाची चौकशी करावी, अशी याचिका परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्याची माहिती, खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे.

काय म्हणाले देशमुख?

परमबीर सिंग यांनी पत्रात केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत, त्यांच्याशी आपला काहीही संबंध नाही असे गृहमंत्री अनिल देशमुख वारंवार सांगत असताना आता त्यांनी या बाबतीत एक नवा खुलासा केला आहे. मला कोविड झाल्यामुळे नागपूरच्या रुग्णालयात मी ५ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी दाखल होतो. त्यानंतर मी थेट १५ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी मी होम क्वारंटाईन होतो व त्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी मी पहिल्यांदाच सह्याद्री अतिथी कक्ष येथे बैठकीला गेलो, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगत आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here