सिंग-वाझे भेटीतील बोलणे कळले नाही! काय कारण दिले पोलिसांनी?

55

न्या. चांदीवाल आयोगाच्या दालनाबाहेर असलेल्या खोलीत परमबीर सिंग आणि सचिन वाझे बसले होते, त्या ठिकाणी काही वेळा करीता वाझेला तुरुंगातून आणणाऱ्या पोलिसांपैकी पोलिस उपनिरीक्षक होते, सिंग आणि वाझे यांच्यात काय चर्चा झाली, हे जाणून घेण्यासाठी चौकशी अधिकारी यांनी उपनिरीक्षक यांना विचारले असता ‘ते दोघे इंग्रजी भाषेत बोलत होते, त्यातील एकही शब्द कळला नाही’, असे उत्तर या उपनिरीक्षकाने चौकशी अधिकारी यांना दिल्याचे समजते.

१० मिनिटे चर्चा झाली

न्या. चांदीवाल आयोगाकडून १०० कोटी रुपयांच्या कथित वसुलीची चौकशी सुरू आहे. या चौकशीसाठी सोमवारी आयोगासमोर १०० कोटी वसुलीचा आरोपी करणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग आणि या कटात सामील असणारा बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्याकडे चौकशी सुरू आहे. सोमवारी या दोघांना आयोगाने चौकशीसाठी बोलावून घेतले होते. दरम्यान अंडरट्रायल कैदी असलेला सचिन वाझे याला तळोजा तुरुंगातून आयोगासमोर हजर करण्याची जबाबदारी नवी मुंबई पोलिस दलाच्या सशस्त्र विभागाची होती. या विभागाचे पोलिस उपनिरीक्षक पाटील आणि इतर तीन पोलिस शिपाई यांनी वाझे याला आयोगासमोर आणले, त्या वेळी परमबीर सिंग आणि वाझे समोरासमोर आले व दोघांना काही वेळासाठी आयोगाच्या दालनाबाहेर असणाऱ्या खोलीत ठेवण्यात आले होते. वाझे आणि सिंग यांच्यात १० मिनिटे चर्चा झाली, त्यावेळी उपनिरीक्षक पाटील थोड्या वेळासाठी त्या खोलीत होते.

(हेही वाचा परमबीर सिंह यांचं आज निलंबन होणार?)

दोघे इंग्रजीत बोलत होते

वाझे आणि सिंग यांच्या कथित गुप्त बैठकीबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी चौकशीचे आदेश मुंबई पोलिस आयुक्तांना दिले होते. या चौकशीसाठी सहाय्यक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. या दरम्यान चौकशी अधिकारी यांनी वाझे आणि सिंग यांच्यात काय बोलणे झाले, हे जाणून घेण्यासाठी उपनिरीक्षक पाटील यांच्याकडे यांचा जबाब नोंदवताना विचारले असता ‘ते दोघे इंग्रजीत बोलत होते, मला त्यातील एकही शब्द कळला नाही’, असे पाटील याने चौकशी अधिकारी यांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. मुंबई पोलिसांकडून हा डिफॉल्ट अहवाल नवी मुंबई पोलिसांना पाठवला असून या पोलिसांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा सल्ला दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.