कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी; परशुराम घाट आठ दिवस बंद

123

राज्यभरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. कोकणात देखील पावसाने चांगलाच जोर धरला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील चार दिवस म्हणजेच ५ ते ८ जुलै या कालावधीत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहे. पावसाचा जोर असा कायम राहिला तर कोकणात पाणी भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. परशुराम घाटात वारंवार दरळी कोसळत असल्याने हा घाटातील वाहतून गेल्या दोन दिवसांपासून पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती. हा घाट धोकादायक स्थितीत असल्याने प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली असून घाट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या घाटातील परिस्थितीची पाहणी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.

( हेही वाचा : हॉटेलमधील सेवा नि:शुल्कच; Service Tax चा आग्रह केल्यास येथे करा तक्रार )

आठ दिवस परशुराम घाट बंद 

चौपदरीकरणाचे काम सुरू असल्यामुळे या डोंगराला भेगा पडल्या आहेत. यामुळे रस्त्यावरील वाहतुकीसोबतच परशुराम गाव आणि वस्तीतील घरांना सुद्धा धोका निर्माण झाल्यामुळे हा घाट बंद ठेवण्याचा निर्माण घेण्यात आला आहे. यानंतर महामार्ग प्रशासनाच्या अहवालानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल असे सांगितले जात आहे.

( हेही वाचा : मोबाईल अ‍ॅपद्वारे करता येणार रिक्षा-टॅक्सी चालकांच्या तक्रारी; मनमानी कारभाराला चाप)

मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. सध्या घाटात महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे काही ठिकाणी दरड सुद्धा कोसळली आहे. त्यामुळे घाट गेल्या २० तासांपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. तसेच खबरदारी म्हणून या घाट आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.