धक्कादायक! पुण्यातील शाळेत महिला बाऊन्सरकडून पालकांना मारहाण

150

महिला बाऊन्सरकडून शाळेतच पालकांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. पालकांनी फी बाबत विचारणा केली असता मारहाण करण्यात आली आहे. ही घटना पुणे- बिबवेवाडी परिसरातील क्लाईन मेमोरियल शाळेत घडली. या प्रकरणी पालक मंगेश गायकवाड यांच्याकडून शाळेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून अदखलपात्र गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. पण अद्याप क्लाईन मेमोरियल शाळेकडून पालकांच्या आरोपांवर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

( हेही वाचा : मुंबईसह राज्यातील सर्वच महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर! )

पालकांना मारहाण

सगळे पालक शाळेत मुलांच्या शाळेची फी भरण्यासाठी मुख्याध्यापकांकडून आलेल्या पत्राबाबत आपले म्हणणे मांडण्यासाठी गेले होते. त्यावेळी मुख्याध्यापकांना भेटण्याची मागणी करणाऱ्या पालकांना महिला बाऊन्सरने मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार पुण्याच्या बिबवेवाडी परिसरातील क्लाईन मेमोरियल स्कूलमध्ये घडला. या प्रकरणी संबंधित पालकाने तक्रार दिली असून बिबवेवाडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगेश पांडुरंग गायकवाड (49) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शाळेत मंगेश पांडुरंग गायकवाड यांचा मुलगा शिक्षण घेतो. मुलाची फी भरण्यासाठी त्यांना शाळेच्या मुख्याध्यापकांनी पत्र दिले होते. त्यावर खुलासा देण्यासाठी तक्रारदार आणि इतर काही पालक शाळेत आले होते. या पालकांनी मुख्याध्यापकांकडे लेखी म्हणणे दिल्यानंतर त्याची पोच पावती मागितली. यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी महिला बाऊन्सरला बोलावून मारहाण करायला लावल्याचे मंगेश गायकवाड यांनी तक्रारीत म्हटले आहे.

गुन्हा दाखल

दरम्यान, सोशल मीडियात या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. जर आपले म्हणणे मांडण्यासाठी गेलेल्या पालकांना शाळेच्या आवारातच अशाप्रकारे मारहाण होत असेल, तर हे खूपच धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया सर्वच स्तरातून व्यक्त केली जात आहे. तक्रारदार हे बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गेल्यानंतर याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.