पालकांनी उठसूट शिक्षकांना जबाबदार धरू नये – उच्च न्यायालय

178

शालेय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर शाळेचे प्रशासन व शिक्षकांना गोवण्याच्या पालकांच्या प्रवृत्तीवर मद्रास उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले. शिक्षक व मुख्याध्यापकांच्या गैरवर्तनाबद्दल पुरेसे पुरावे असतील तरच त्यांना जबाबदार धरले जाऊ शकते, असे न्यायमूर्ती एस. एम. सुब्रमण्यम यांनी म्हटले.

खापर फोडायचे म्हणून फोडणे सोपे आहे. मात्र, शाळेत शिस्त राखणे अत्यंत कठीण आहे. विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रकरण समोर येते, तेव्हा पुरावे नसताना पालकांनी ऊठसूट शिक्षकांना दोष देणे ठीक नाही. नाहक खापर फोडण्याचा परिणाम शाळेच्या प्रतिमेवर आणि तिथे शिकणा-या इतर मुलांच्या हितावरही होतो. बदनामी करणे सोपे आहे. परंतु सरकारी शाळांमध्ये शिस्त राखणे व चांगले निकाल लावणे कठीण आहे. आरोप असतील तर ते पुराव्यानिशी सिद्ध करता यायला हवेत, असेही न्यायालयाने म्हटले.

( हेही वाचा: शिंदे गटाचे ठरले; मुंबईतून देणार एक कॅबिनेट आणि राज्यमंत्री )

सारे काही चांगल्या निकालासाठी….

  • मुख्याध्यापकांनी शाळेत शिस्त पाळली. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात उत्तीर्णतेचे प्रमाण 45 टक्क्यांवरुन 90
    टक्क्यांपर्यंत नेले.
  • जिल्हा शिक्षणाधिकारी, मुख्य शिक्षणाधिकारी आणि पोलीस अधिका-यांनी केलेल्या तपासात मुख्याध्यापकांनी चांगल्या निकालासाठीच मेहनत घेतल्याचे समोर आले आहे.
  • संबंधित विद्यार्थी अभ्यास करत नव्हता. तो शाळेत उपस्थित राहत नव्हता, असेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

काय म्हणाले न्यायालय?

मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना चांगले नागरिक घडवण्याचे काम केल्याबद्दल न्यायालयाने समाधान व्यक्त केले. अशा प्रयत्नांना परावृत्त केले, तर शिक्षक निष्ठेने आपले कर्तव्य पार पाडू शकणार नाहीत, असे निरिक्षण नोंदवले.

माता- पित्याची भूमिका

नैसर्गिक पालक असल्याने पाल्याच्या जडणघडणीत पालकांनी बजावलेली भूमिका महत्त्वाची आहे. पालकांनी घरातच व घराबाहेर दोन्ही ठिकाणी आपल्या मुलांच्या कृत्यांवर लक्ष ठेवणे गरजेचे असते, असेही न्यायालयाने म्हटले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.