सर्वाधिक लोकप्रिय असलेले सोशल मीडिया अॅप्लिकेशन व्हॉट्सअप अनेक भागात डाऊन झाल्याचे समोर आले आहे. मात्र याबाबत व्हॉट्सअपकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. अखेर दोन तासांनी बंद असलेली व्हॉट्सअपची सेवा भारतातील काही शहरांमध्ये पुन्हा सुरू झाल्याचे समोर आले आहे. साधारण दीड ते दोन तास व्हॉट्सअपची सेवा बंद असल्याने देशभरातील सर्वाधिक युजर्स ‘मेटा’कुटीला आले होते. सर्वच कार्यालयांमध्ये संवादाचे माध्यम म्हणून व्हॉट्सअप या मॅसेन्जर अॅप्लिकेशनचा वापर केला जातो. मात्र या बिघाडामुळे सर्वच युजर्स गोंधळात पडले होते.
कंपनीने दिलं स्पष्टीकरण
मंगळवारी दुपारी १२ वाजल्यापासून व्हॉट्सअपची सेवा ठप्प असल्याने युजर्स हैराण झाले होते. दरम्यान, व्हॉट्सअपच्या मालकीची कंपनी मेटाने याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले की, काही युजर्सना मेसेज पाठवण्यात समस्या येत आहेत. आम्ही ती समस्या लवकरात लवकर दूर करण्यासाठी काम करत आहोत. आम्ही शक्य तितक्या लवकर प्रत्येकासाठी व्हॉट्सअप रिस्टोर करण्यासाठी काम करत आहोत, असेही प्रवक्त्यांनी सांगितले आहे.
(हेही वाचा – व्हाईट हाऊसमध्ये मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी, बघा व्हिडिओ)
Partial restoration of WhatsApp services appears to have begun in some cities of India pic.twitter.com/85DYUxBz7N
— ANI (@ANI) October 25, 2022
सुरूवातीला इंटरनेटची समस्या असल्याने युजर्सने व्हॉट्सअपच्या गोंधळाकडे लक्ष दिले नाही. मात्र इतर वेबसाईट नीट सुरू असल्याने फक्त व्हॉट्सअपवर मेसेज येत-जात नसल्याने युजर्स गोंधळात पडले. तोपर्यंत सोशल मीडियावर युजर्सकडून तक्रारी सोशल मीडियावर येऊ लागल्या. तर काही वेळात ट्विटरवर #WhatsAppDown चा ट्रेंड सुरू झाल्याचे दिसून आले.
दरम्यान, यापूर्वीही काही वेळा फेसबुकच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने व्हॉट्सअपची सेवा ठप्प पडली होती. त्यानंतर पुन्हा एकदा व्हॉट्सअप डाऊन झाल्याचे समोर आले होते. याबाबत ट्विटरवर युजर्सकडून याबाबत वेगवेगळे दावे करण्यात येत होते. यामध्ये व्हॉट्सअपचा सर्व्हर डाऊन झाल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र व्हॉट्सअप डाऊन झाल्याने युजर्सकडून इतर मेसेजिंग अॅप्लिकेशनचा वापर करण्यात आल्याचे पाहायला मिळाले.
Join Our WhatsApp Community