धक्कादायकः टॅक्सी चालकाने येण्यास नकार दिल्याने प्रवाशाने केली त्याची हत्या

टॅक्सी चालकाने जवळच्या ठिकाणी येण्यास नकार दिल्याने झालेल्या वादात प्रवाशाने त्या चालकासोबत मारहाण केली. या मारहाणीत टॅक्सी चालकाचा मृत्यू झाल्याची घटना दादर कबुतर खाना या ठिकाणी रविवारी दुपारी घडली. याप्रकरणी दादर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन प्रवाशाला अटक केली आहे.

काय झाला प्रकार?

छबीराज लोलाई जैस्वार(५५) असे या टॅक्सी चालकाचे नाव आहे. छबीराज हा मानखुर्द येथे राहत होता. रविवारी दुपारी तो प्रवासी भाड्याची वाट पाहत दादर कबुतर खाना येथे उभा होता. त्यावेळी तेथील एक फेरीवाला बसवराज मेलीनामनी हा टॅक्सी चालकाकडे आला व त्याने आंबेडकर नगर येथे येण्याबाबत टॅक्सी चालक छबीराज याला विचारले. मात्र जवळचं भाडं आल्यामुळे टॅक्सी चालक छबीराज याने बसवराज याचे भाडे नाकारले.

(हेही वाचाः मुंबईतील रुग्णसंख्या रविवारी पुन्हा वाढली)

हत्येचा गुन्हा दाखल

यानंतर दोघांत वाद होऊन वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. बसवराज याने केलेल्या मारहाणीत टॅक्सी चालक हा गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच दादर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बसवराज याला ताब्यात घेतले व जखमी टॅक्सी चालकाला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. पण त्याला रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी दादर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन, बसवराज याला अटक केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here