रेल्वेच्या UTS ॲपला प्रवाशांची पसंती; दुप्पट तिकीट बुकिंग

तिकिटांचे बुकिंग, ट्रेनची धावण्याची स्थिती, पीएनआर स्थिती, रिशेड्यूल्ड ट्रेन्स इत्यादी ट्रेनशी संबंधित माहिती घेण्यासाठी रेल्वे प्रवासी यूटीएस ॲपचा वापर करतात. UTS ॲपद्वारे प्रवासी रेल्वेचे तिकीट घर, कार्यालय, दैनंदिन प्रवास करताना अगदी कुठेही सहज बुक करू शकतात.

( हेही वाचा : T20 WorldCup : बुमराहच्या जागी भारतीय संघात ‘या’ गोलंदाजाचा समावेश! BCCI ने ट्विटरवर नाव केले जाहीर)

प्रवाशांच्या संख्येत वाढ 

2022-23 दरम्यानच्या कालावधीत प्रवाशांकडून UTS ॲपचा वापर हळूहळू वाढला आहे. या ॲपद्वारे काढण्यात आलेल्या तिकिटांची दैनंदिन सरासरी 36 हजारवरून सप्टेंबर 2022 मध्ये (27 सप्टेंबर 2022 पर्यंत) 74 हजार एवढी झाली आहे. मार्च २०२२ मध्ये 2.17 लाख प्रवासी यूटीएस ॲपचा वापर करत होते. ही संख्या सप्टेंबर 2022 मध्ये 4.23 लाख एवढी आहे, म्हणजेच यूटीएसचा वापर करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत दुप्पटीने वाढ झाली आहे.

UTS ॲपद्वारे जारी केलेल्या तिकिटांचे योगदान मार्च 2022 मध्ये 4.80% वरून सप्टेंबरमध्ये 7.85% पर्यंत वाढले आहे (27.9.2022 पर्यंत). त्याचप्रमाणे, प्रवाशांची टक्केवारी मार्च 2022 मधील 6.72% वरून सप्टेंबर 2022 मध्ये 10.85% पर्यंत वाढली आहे (27.9.2022 पर्यंत). पथनाट्य, स्किट्स आणि वैयक्तिक समुपदेशन यांसारख्या विविध प्रचारात्मक क्रियाकलापांद्वारे प्रवाशांना युटीएस ॲप वापरण्यास प्रोत्साहित केले जात आहे. यामुळे वेळेची बचत होऊन प्रवास सोयीस्कर होतो.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here