तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. कारण रेल्वे मंत्रालय यात्रेकरूंचा ट्रेन प्रवास स्वस्त आणि सुखकर करण्याच्या विचारात आहे. दरम्यान, रेल्वे मंत्रालयाकडून रेल्वे प्रवाशांना रेल्वे भाड्यात सूट देण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
(हेही वाचा – Indian Railways: ट्रेनमध्ये कोणी तुमची सीट बळकावली तर असा द्या दणका!
भारतीय रेल्वेकडून ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, खेळाडू यांसारखा इतर काही श्रेणींच्या प्रवाशांना रेल्वेकडून भाड्यात सूट दिली जाते. मात्र कोरोना महामारीत ही सूट देणं रेल्वे मंत्रालयाने बंद केले होते. परंतु आता कोरोना महामारीचा संसर्ग आणि धोका कमी झाला असल्याने रेल्वे मंत्रालयाकडून प्रवासी भाड्यात पुन्हा सूट देण्याचा विचार करत आहे.
(हेही वाचा – नीरज चोप्राची ‘रूपेरी’ कामगिरी, 19 वर्षानंतर भारताने जिंकले पदक!)
ज्येष्ठांना सवलतीच्या दरात रेल्वे प्रवास पुन्हा कधी मिळणार, असा प्रश्न संसदेत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना विचारण्यात आला, त्यावेळी रेल्वे मंत्र्यांनी लेखी उत्तर देत म्हटले की, कोरोना काळात गेल्या दोन वर्षात रेल्वेच्या उत्पनात मोठी घट झाली. 2019-20 आर्थिक वर्षातील उत्पन्नापेक्षा कमी आहे, त्यामुळे रेल्वेवर मोठा आर्थिक परिणाम झाल्याचेही त्यांनी म्हटले.
लवकरच सवलत होणार सुरू
कोरोनानंतर आता अर्थव्यवस्था रूळावर येत आहे. त्यामुळे येत्या काळात सकारात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास रेल्वे मंत्रालयाकडून पुन्हा सवलत सुरू करण्याचा विचार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे लवकर रेल्वेचा प्रवास स्वस्त आणि सुखकर होणार असल्याचे संकते आहे.
Join Our WhatsApp Community