टिटवाळा स्टेशन परिसरात संतप्त प्रवाशांनी रोखली लोकल ट्रेन! काय आहे कारण?

टिटवाळा रेल्वे स्थानकात लोकल ट्रेन प्रवाशांनी रेल रोको केला आहे. मुंबईकडून येणाऱ्या लोकल सतत उशिराने येत असल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण होते. यावेळी संतप्त झालेल्या प्रवाशांनी थेट रेल्वे मार्गावर उतरत रेल्वे अडवण्याचा प्रयत्न केला. तब्बल १५ ते २० मिनिटं प्रवासी रेल्वे ट्रॅकवर उतरले आणि त्यांनी लोकल पुढे न जाऊ देण्याचा प्रयत्न केला. टिटवाळा रेल्वे स्थानक परिसरात बुधवारी सकाळी हा प्रकार घडला. प्रवासी रेल्वे ट्रॅकवर उतरल्याने काही लोकलचे वेळापत्रक कोलमडल्याचे पाहायला मिळाले.

(हेही वाचा – ‘खटले न चालवता भर चौकात फासावर लटकवा’, श्रद्धा हत्याकांडाबाबत राऊतांची संतप्त प्रतिक्रिया)

काय आहे प्रकरण

मुंबईवरून येणारी प्रत्येक लोकल ट्रेन उशिरा येत असल्याने प्रवाशांचा राग अनावर झाला. १५ मिनिटं रेल्वे ट्रॅकवर उतरून प्रवाशांनी आपला राग व्यक्त केला. मुंबईवरून येणारी लोकल उशिरा येत असल्याने रेल्वे प्रवासी खूप आक्रमक झाले होते. या संतप्त प्रवाशांनी बुधवारी सकाळी ८.१९ ची लोकल टिटवाळा रेल्वे स्थानकात अडवली. यामुळे सकाळी कामाच्या वेळी लोकल विलंबाने धावत असल्याने प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले.

दरम्यान, हा प्रकार होत असल्याचे निदर्शनास येताच रेल्वे पोलीस व रेल्वे प्रशासनाने घटनास्थळी पोहचून प्रवाशांना बाजूला केले आहे. मुंबईकडून येणाऱ्या लोकल गाड्या उशिराने येत असल्याने प्रवाशांना कामाच्या ठिकाणी लेट मार्क लागत होता. आजही असाच प्रकार घडल्याने प्रवाशांच्या सहनशिलतेचा अंत झाला आणि त्यांनी थेट रेल्वे रुळांवर उतरले. मात्र पोलिसांनी तातडीने यामध्ये लक्ष घालत या संतप्त प्रवाशांना बाजूला करत रेल्वे वाहतूक पुन्हा सुरु केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here