आता रेल्वे स्थानकांवर मोबाईलवरच QR कोडद्वारे तिकीट

रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना जनरल तिकीट काढण्यासाठी रांगेत थांबण्याची गरज नाही. कारण आता मोबाईलवरच क्यूआर कोडद्वारे तिकीट मिळत आहे. यामुळे कागदाचीही बचत होणार आहे. त्यासाठी प्रवाशांना यूटीएस मोबाईल तिकिटिंग हे ॲप डाउनलोड करावे लागणार आहे.

(हेही वाचा – Indian Railway: हिवाळ्यात ट्रेनची AC बंद असते, तरीही रेल्वे त्यासाठी शुल्क आकारते! पण का ?)

पुणे रेल्वे स्थानकावर लोकल व मेल एक्स्प्रेसच्या जनरल तिकिटासाठी नेहमीच मोठी रांग लागलेली असते. यात प्रवाशांचा बराच वेळ वाया जातो. पुणे स्थानकावर तिकीट खिडकीवरून व एटीव्हीएमवरून प्रवाशांना जनरल तिकीट मिळते. यात सर्वाधिक गर्दी तिकीट खिडकीवर असते. अनेकदा एटीव्हीएम मशिनमध्ये बिघाड होतो तर कधी तिथे रेंजची अडचण आल्याने प्रवाशांना तिकीट काढण्यात अडचणी येतात. मात्र क्यूआर कोडवरून तिकीट काढताना याची अडचण येणार नाही, याची काळजी घेतली असल्याचे सांगितले जात आहे. तसेच जनरल तिकीट केंद्राजवळ क्यूआर कोडचे बॅनर लावण्यात आले आहे.

कोणत्या स्थानकांवर आहे सुविधा

पुणे, शिवाजीनगर, खडकी, दापोडी, कासारवाडी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, देहूरोड, तळेगाव, वडगाव, कामशेत, मळवली या स्थानकांवर देखील क्यूआर कोडने तिकीट काढण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचत असून मोठी सोय झाल्याचे पाहायला मिळत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here