स्वातंत्र्यांच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त मुंबई महापालिका मुख्यालयात शुक्रवारी सायंकाळी देशभक्तीपर गीत वाद्यवृंदाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महापालिका मुख्यालयाच्या प्रवेश क्रमांक २ च्याठिकाणी सायंकाळी पाच ते सात या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे.
( हेही वाचा : मुंबईकरांना ३५ लाख राष्ट्रध्वजांचे वाटप, आणखी ५ लाख ध्वजांची खरेदी)
देशभक्तीपर गीते वाद्यवृंदामार्फत सादर करण्यात येणार
स्वातंत्र्यांचा सुवर्ण महोत्सव १३ ऑगस्टपासून सुरु होत असून १५ ऑगस्टपर्यंत प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरांवर तिरंगा लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यासाठी महापालिकेच्या माध्यमातून राष्ट्रध्वजांचे मोफत वाटप केले जात आहे. या तिन दिवसांच्या कालावधीत विविध कार्यक्रम आणि इमारतींना विद्युत रोषणाई करण्याचेही आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे महापालिकेच्या मुख्यालयासह वरळी हब आणि इतर महापालिका कार्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव शनिवारी १३ ऑगस्ट पासून सुरु होत असल्याने त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे शुक्रवारी १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत महापालिका मुख्यालयाच्या प्रवेश क्रमांक दोन जवळ देशभक्तीपर गीते वाद्यवृंदामार्फत सादर करण्यात येणार आहे. या देशभक्तीपर वाद्यवृंदाच्या कार्यक्रमांमध्ये जहाँ डाल डाल पार.., सैनिक हो तुमच्यासाठी…, मेरे देश की धरती…, संदेसे आते है…, कल चले हम फिदा…, शूर आम्ही सरदार…, वंदे मातरम…, ध्वज विजयाचा उंच धरा रे…, साथी हात बढाना …, जय जय महाराष्ट्र माझा आदी गीत गायली जाणार आहे.
Join Our WhatsApp Community