पवन मल्होत्रा (Pavan Malhotra) यांचा जन्म २ जुलै १९५८ साली दिल्ली येथे झाला. ते एक प्रसिद्ध भारतीय अभिनेते आहेत. त्यांनी कित्येक टेलिव्हिजन मालिका, हिंदी चित्रपट तसेच पंजाबी आणि तेलगू चित्रपटांतही कामं केली आहेत. त्यांना त्यांच्या चांगल्या कामासाठी फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड, फिल्मफेअर अवॉर्ड साऊथ आणि आणखी बरेच अवॉर्ड मिळाले आहेत.
१९८९ साली प्रदर्शित झालेला बुद्धदेव दासगुप्ता यांच्या बाग बहादूर नावाच्या चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटाला ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ देण्यात आला होता. तसेच सईद अख्तर मिर्झा यांच्या ‘सलीम लंगडे पे मत रो’ या चित्रपटामध्येही पवन मल्होत्रा (Pavan Malhotra) यांनी प्रमुख भूमिका साकारली होती.
(हेही वाचा – India T20 Champion : वादळामुळे भारतीय संघ बार्बाडोसमध्येच अडकलेला)
२००३ सालच्या तेलुगू चित्रपटाल्या त्यांच्या कोल्ड ब्लडेड माफिया डॉन इरफान खान या भूमिकेसाठी ते प्रसिद्ध आहेत. तसेच २००४ साली आलेल्या ब्लॅक फ्रायडे चित्रपटात त्यांनी टायगर मेमनची भूमिका निभावली आहे. त्यांच्या या भूमिकेची खूप प्रशंसा करण्यात आली होती. २००५ साली त्यांनी ‘अनुकोकुंदा ओका रोजू’ या तेलगू चित्रपटात तांत्रिक म्हणून काम केलं होतं.
पवन मल्होत्रा (Pavan Malhotra) यांनी दिल्ली युनिव्हर्सिटीच्या हंसराज कॉलेजमधून आर्ट्समध्ये पदवी शिक्षण पूर्ण केलं. त्यांच्या चित्रपटांच्या कारकिर्दीची सुरुवात सांगायची झाली तर गांधी चित्रपटाचं चित्रीकरण सुरू असताना वेषभूषा विभागात पवन मल्होत्रा (Pavan Malhotra) यांनी साहाय्यक म्हणून पहिल्यांदाच काम केलं होतं. इथूनच त्यांच्या चित्रपटांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर त्यांनी ‘जाने भी दो यारो’, ‘खामोश’ आणि ‘मोहन जोशी हाजीर हो!’ या टेलिव्हिजन मालिकांसाठी प्रोडक्शन असिस्टंट म्हणून काम केलं होतं.
(हेही वाचा – Maharashtra legislative election मध्ये अनिल परब, अभ्यंकर आणि निरंजन डावखरे विजयी)
१९८६ सालच्या दूरदर्शनवरच्या नुक्कड नावाच्या मालिकेत त्यांनी साकारलेली भूमिका लोकांच्या लक्षात राहिली. त्यादरम्यान, त्यांनी चित्रपटसृष्टीतही प्रवेश केला होता. त्यांनी १९८४ साली आलेल्या पंकज पराशर यांच्या ‘अब आएगा मजा’ या चित्रपटामधून चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केलं.
गेल्या काही वर्षांत पवन मल्होत्रा (Pavan Malhotra) यांनी बुद्धदेव दासगुप्ता, सईद अख्तर मिर्झा, श्याम बेनेगल, दीपा मेहता आणि रोलँड जोफे यांसारख्या दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community