अपघातामुळे रेल्वेच्या ११ गाड्या रद्द, १० एक्स्प्रेसचे मार्ग बदलले

134

नाशिकजवळ पवन एक्स्प्रेसला रविवारी मोठा अपघात झाला. रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. अपघाताचे स्वरूप पाहता हा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. देवळाली कॅम्प ते घोटी दरम्यान लोहशिंगवे गावजवळ मुंबईकडून बिहारच्या जयनगरला जाणाऱ्या पवन एक्सप्रेस १० ते १२ डबे रुळावरून घसरले. या दुर्घटनेमुळे मध्य रेल्वेकडून ११ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर दहा रेल्वेगाड्यांचे मार्ग अपात्कालिन स्थितीत बदलण्यात आले आहेत.

अपघातामुळे या गाड्यांचा मार्ग बदलला

पवन एक्स्प्रेसला झालेल्या अपघातामुळे मुंबईहुन सुटणारी देवगिरी एक्स्प्रेस, हुजुरसाहिब नांदेड राज्यराणी एक्स्प्रेस, नंदीग्राम एक्स्प्रेस, अमरावती एक्स्प्रेस, पुरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. तसेच हावडा दुरांतो एक्स्प्रेस, हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस, उद्योगनगरी एक्स्प्रेस, सुलतानपुर सुपरफास्ट एक्स्प्रेस, पंजाब मेल, पटना-जनता एक्स्प्रेस, सेवाग्राम या सर्व गाड्यांचा मार्ग बदलण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

या सर्व रेल्वेगाड्या रद्द

तसेच पंचवटी एक्स्प्रेस (१२१०९/१०), नंदीग्राम (११४०१), हुजुरसाहिब नांदेड राज्यराणी (१७६११/१२), पुरी सुपरफास्ट (१२१४५/४६), अमरावती सुपरफास्ट (१२१११), मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस (१२११२), अजमेर शताब्दी एक्स्प्रेस (१२०१५), देवगिरी एक्स्प्रेस (१७०५७) या सर्व रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. विदर्भ सुपरफास्ट एक्स्प्रेस (१२०१६), देवगिरी एक्स्प्रेस (१७५८), नंदीग्राम (११४०२), तपोवन एक्स्प्रेस (१७६१८) या चार रेल्वेगाड्यांचा प्रवास अर्ध्यावरच (शॉर्ट टर्मिनेट) थांबला आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

(हेही वाचा – नाशिकजवळ पवन एक्स्प्रेसला मोठा अपघात)

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, दादर, ठाणे, इगतपुरी जंक्शन, नाशिकरोड, मनमाड, भुसावळ या सर्व रेल्वेस्थानकावर रेल्वे प्रशासनाकडून अपात्कालिन चौकशी व मदत केंद्र तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आले आहेत. या केंद्रांवरुन प्रवाशांना विविध मार्गावरील रेल्वेगाड्या व दुर्घटनेमुळे प्रभावित झालेल्या रेल्वेगाड्या व त्यांच्या वेळापत्रकात आणि मार्गात करण्यात आलेले बदलांविषयीची माहिती दिली जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.