-
ऋजुता लुकतुके
पेटीएम पेमेंट्स बँकेवर अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई करताना ५.४९ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. अर्थ मंत्रालयानेही पत्रक काढून याविषयीची माहिती दिली आहे. ‘देशातील काही व्यक्ती आणि संस्थांकडून ऑनलाईन सट्टेबाजीच्या उद्योगात पैसा गुंतवला जात आहे. किंवा तशी सुविधा पुरवली जात आहे, असा अहवाल केंद्रीय तपास यंत्रणांकडून आल्यावर काही कंपन्यांवर सक्त वसुली संचलनालयाकडून लक्ष ठेवण्यात आलं. आणि तिथे पेटीएम पेमेंट्स बँक पहिल्यांदा तपास यंत्रणेच्या रडारवर आली. आणि गैरप्रकार उधड झाला,’ असं अर्थ मंत्रालयाकडून शुक्रवारी स्पष्ट करण्यात आलं आहे. (Paytm Crisis)
बाहेरच्या देशातून पेटीएम पेमेंट्स बँकेत गुंतवणूक होत होती. ती अयोग्य मार्गाने आणि चुकीच्या कारणासाठी होती, असा ठपका ठेवत बँकेवर सध्या मनी लाँडरिंगसाठी ही कारवाई झाली आहे. (Paytm Crisis)
Financial Intelligence Unit-India imposes Rs 5.49 cr penalty on Paytm Payments Bank for money laundering: FinMin
— Press Trust of India (@PTI_News) March 1, 2024
(हेही वाचा – Bombay High Court च्या आदेशामुळे निवडणूक कामापासून धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सुटका)
म्हणजेच गुन्हेगारी स्वरुपाच्या कामासाठी (इथे ऑनलाईन सट्टेबाजी) पेटीएम पेमेंट्स बँकेच्या माध्यमातून पैसा हस्तांतरित होत होता. आणि चुकीच्या मार्गाने मिळवलेला पैसा पुन्हा एकदा पेमेंट्स बँकेच्या माध्यमातून फिरवला किंवा वळवला जात होता, असा आरोप सिद्ध झाला आहे. आणि त्यासाठी पेटीएम पेमेंट्स बँकेवर ही कारवाई झाली आहे. (Paytm Crisis)
फेब्रुवारीत पेटीएम पेमेंट्स बँकेवर निर्बंध लादल्यानंतर बँकेकडून जी कागदपत्रं सादर करण्यात आली, त्यामुळे तपास यंत्रणांच्या संशयावर शिक्कामोर्तब झालं आहे. आणि बँकेचा गुन्हा सिद्ध झाल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेनं तातडीने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. (Paytm Crisis)
‘आमच्या कंपनीवर आता जी कारवाई झाली आहे ते काम आम्ही २ वर्षांपूर्वी थांबवलं आहे. आणि कंपनीच्या यंत्रणेत सुधारणा करून असे व्यवहार पुन्हा होण्यापासून आम्ही रोखलं आहे. आता पेटीएम पेमेंट्स बँकेची यंत्रणा अधिक सुरक्षित आणि पारदर्शी आहे,’ असं पेटीएम कंपनीच्या प्रवक्त्यांनी मीडियाला पत्रक काढून कळवलं आहे. (Paytm Crisis)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community