ऋजुता लुकतुके
रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank) महत्त्वाची कारवाई करताना पेटीएम पेमेंट्स बँकेवर काही निर्बंध घातले आहेत. नवीन ठेवी स्वीकारण्यास तसंच कर्ज उपलब्ध करून देण्यास त्यांना मनाई करण्यात आली आहे. हे निर्बंध २९ फेब्रुवारीपासून लागू होतील. ११ मार्चलाच मध्यवर्ती बँकेनं पेटीएम बँकेला नवीन ग्राहक जोडण्यास मनाई केली होती.
रिझर्व्ह बँकेनं पेटीएम पेमेंट्स बँकेचं ऑडिट मध्यंतरी करून घेतलं होतं. आणि त्रयस्थ संस्थेनं केलेल्या या ऑडीटमध्ये त्रुटी आढळल्याचं रिझर्व्ह बँकेला जाणवलं आहे. बँकिंग नियमांचं पालन पेटीएमकडून झालेलं नाही. म्हणूनच हे निर्बंध घालण्यात आले आहेत. (PayTM Payments Bank)
(हेही वाचा – Ind vs Eng 2nd Test : दुसऱ्या कसोटीत भारतीय संघात समावेशासाठी सर्फराझ आणि रजत पाटिदार यांच्यात टक्कर)
‘पेटीएम पेमेंट्स बँकेच्या ग्राहकांच्या खात्यात कुठल्याही प्रकारच्या मुदतठेवी, कर्ज, बचत खात्यांमधील ठेवी या स्वीकारल्या जाऊ नयेत. तसंच फास्टटॅग (Fastag), एनसीएमसी (NCMC) कार्ड्स किंवा वॉलेट्समध्येही पैसे भरले जाऊ नयेत. पण, कुठला परतावा, रिवॉर्ड ग्राहकांच्या खात्यात जमा होणार असेल तर तो जरुर केला जावा,’ असे निर्देश रिझर्व्ह बँकेनं पत्रक काढून दिले आहेत. हे निर्बंध २९ फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत.
Action against Paytm Payments Bank Ltd under Section 35A of the Banking Regulation Act, 1949https://t.co/bswaWHSxtk
— ReserveBankOfIndia (@RBI) January 31, 2024
ग्राहकांनाही मनी ट्रान्सफर किंवा युपीआय सुविधा वापरता येणार नाहीत
त्याचबरोबर जर ग्राहकांना कुठल्याही खात्यातून किंवा वॉलेटमधून पैसे काढून घ्यायचे असतील, तर ते खात्यात पैसे असे पर्यंत त्यांना काढण्याती सोय करून द्यावी, असंही मध्यवर्ती बँकेनं पेटीएमला बजावलं आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेनं कुठल्याही प्रकारे पैसे हस्तांतरित करु नयेत किंवा युपीआय पेमेंट्सही स्वीकारू नयेत, असं बँकेनं बजावलं आहे. त्यामुळे ग्राहकांनाही मनी ट्रान्सफर किंवा युपीआय या सुविधा पेटीएमवर वापरता येणार नाहीत.
वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेड आणि पेटीएम पेमेंट्स लिमिटेड या दोन मूळ कंपन्यांची खातीही त्वरित बंद करण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेनं दिले आहेत. या मूळ खात्यातील सर्व व्यवहार १५ मार्चच्या आत संपवण्याचे निर्देश बँकेनं दिले आहेत. (PayTM Payments Bank)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community