प्रत्येक पाठ्यपुस्तकाच्या पहिल्या पानावर ठळक अक्षरात छापलेली प्रतिज्ञा शाळा भरताना, खूप आवडीने म्हटली जाते. पण आपली ही आवडती प्रतिज्ञा कोणी लिहिली हे माहिती आहे का?
पाठ्यपुस्तकातील पाठाखाली वा कवितेखाली त्या त्या लेखकाचे वा कवीचे नाव लिहिलेले असते. परंतु पाठ्यपुस्तकात पहिल्या पानावर असणारी प्रतिज्ञा कोणा लिहिली असेल, असा प्रश्न कधी पडला आहे का?
भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत ही प्रतिज्ञा भाषांतरित झालेली आहे. आंध्र प्रदेशचे सुप्रसिद्ध तेलगू साहित्यिक पेदेमरी व्यकंट सुब्बाराव यांनी 1962 मध्ये तेलगू भाषेत ही प्रतिज्ञा पहिल्यांदा लिहिली.
पेदेमरी व्यकंट सुब्बाराव हे आंध्रप्रदेशातील अन्नेपथी गावचे रहिवासी होते. विशेष म्हणजे त्याकाळात त्यांचे संस्कृत, इंग्रजी आणि अरेबिक भाषेत पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण झाले होते. ते उच्च शिक्षित सरकारी अधिकारी होते. विशाखापट्टणम या जिल्ह्याचे ते कोषागार अधिकारी होते. ही नोकरी करत असतानाच, ते कथा आणि कविता लिहायचे. त्याकाळात त्यांनी कादंब-या, कथासंग्रह, कविता प्रसिद्ध केल्या होत्या.
पेदेमरी व्यकंट सुब्बाराव यांची वृत्ती राष्ट्रप्रेमी होती. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता आणि त्यातूनच जन्म झाला प्रतिज्ञेचा. आपल्या जिल्ह्यातील शाळेतील मुलांना म्हणायला त्यांनी ही प्रतिज्ञा दिली आणि शिक्षण खात्यात काम करणा-या त्यांच्या एका मित्राने ही प्रतिज्ञा पाहिली. त्यांना प्रतिज्ञा खूप आवडली आणि त्यांनी प्रतिज्ञा शाळांमध्ये घेण्याचा आदेश दिला.
( हेही वााचा: NH8, NH13; असे क्रमांक राष्ट्रीय महामार्गांना का दिले जातात ? )
12 ऑक्टोबर 1964 रोजी बंगळूरु येथे या समितीने घेतलेल्या मीटिंगमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री एम.सी.छागला यांनी ही प्रतिज्ञा शाळा काॅलेजमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना राहावी याकरता घेतली जावी, असे स्पष्ट निर्देश दिले.
26 जानेवारी 1965 पासून ही प्रतिज्ञा देशपातळीवर लागू करण्याच्या सूचना करण्यात आल्या. नंतर या प्रतिज्ञेचे सर्व भाषांत भाषांतर करण्यात आले. देशातील सर्व क्रमिक पाठ्यपुस्तकात या प्रतिज्ञेला समाविष्ट करण्यात आले.
Join Our WhatsApp Community