मुंबईतील अनेक भागांमधील पादचारी पुलांची बांधकामे रखडलेली असल्याने पूल विभागाच्या माध्यमातून या पुलांची कामे हाती घेण्यात येत आहेत. त्यामुळे कांदिवली आणि बोरीवलीमधील मोडकळीस आलेल्या पादचारी पुलाच्या जागेवर पुनर्बांधणी करणे तसेच दहिसरमध्येही एका पादचारी पुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे. या तिन्ही पादचारी पुलांसाठी सुमारे साडेचार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
मुंबईच्या पश्चिम उपनगराच्या सीमारेषेला असलेल्या दहिसर पश्चिम येथील कांदरपाडा येथे पादचारी पूल बांधण्याची मागणी सातत्याने होत आहे. त्यामुळे कांदरपाडा येथे दहिसर नदीवर ६० मीटर लांब आणि ४ मीटर रुंद अशा प्रकारे नवीन पादचारी पूल बांधण्यात येणार आहे.
( हेही वाचा : बेस्ट गाड्यांमध्ये लस प्रमाणपत्र तपासतच नाही! कारण… )
( हेही वाचा : रुग्ण वाढीचा पारा पुन्हा वर चढला… )
बोरीवली व कांदिवली येथे पादचारी पुलाची पुनर्बांधणी
तर बोरीवली पूर्व येथील रतननगर पादचारी हे पूल मोडकळीस आले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांसाठी हा पूल बंद करण्यात आला आहे. हा पादचारी पूल रतननगर पश्चिम द्रुतगती मार्गाला जोडतो, त्यामुळे या पादचारी पुलाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे १०० मीटर लांब व ३ मीटर रुंद असा हा पादचारी पूल आहे.
कांदिवली पश्चिम येथील जोगेळेकर नाल्यावरील अस्तित्वात असलेले पादचारी पूल मोडकळीस आल्याने ते पाडण्यात आले आहे. त्यामुळे या जागेवर १० मीटर लांब आणि ४ मीटर रुंद अशाप्रकारे उंची वाढवून पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. त्यामुळे या तिन्ही पुलांच्या बांधकामासाठी विविध करांसह ४ कोटी ५२ लाख ५ हजार रुपयांचे कंत्राट देण्यात आले असून यासाठी पिनाकी इंजिनिअर्स अँड डेव्हलपर्स ही कंपनी पात्र ठरली आहे.
( हेही वाचा : ‘या’ कामांच्या जोरावर आदित्य ठाकरे मारणार निवडणुकीत बाजी! )
Join Our WhatsApp Community