-
सचिन धानजी,मुंबई
मुंबई महापालिकेच्या ८० वर्षांवरील अधिक निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्त वेतनात आता वाढ होणार असून राज्य शासनाच्या धर्तीवर महापालिकेच्या सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना आता याचा लाभ दिला जाणार आहे. शासनाच्या धर्तीवर मुंबई महापालिकेतील ८० वर्षांवरील निवृत्त कर्मचारी तथा कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना याचा लाभ मिळवून देण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासकांनी मंजूर केला असून लवकरच याबाबतचे परिपत्रक जाही केले जाणार आहे. त्यानंतर याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाणार असल्याचे बोलले जात आहे. (Pension)
(हेही वाचा- भारताने ९ वर्षे आधीच ‘हे’ उद्दिष्ट केले पूर्ण; PM Modi यांनी हरित हायड्रोजनवरील आंतरराष्ट्रीय परिषदेला केले संबोधित)
मुंबई महापालिकेचे (Mumbai Municipal Corporation) एकूण १ लाख १३ हजार ३८९ सेवा निवृत्त कर्मचारी असून त्यात ८० वर्षांवरील सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे ७ हजार ९०० एवढी आहे. या सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याला एक तारखेला बँकेत जमा होते. १ जानेवारी २०१९मध्ये ८० वर्षे व त्यावरील निवृत्त वेतनधारक तसेच कुटुंब निवृत्त वेतनधारकांच्या निवृत्ती वेतन तथा कुटंब निवृत्त वेतनात मूळ निवृत्ती वेतनात १० ते ५० टक्के पर्यंत वाढ देण्यास मंजूरी दिली गेली होती, त्यानुसार ८० वर्षांवरील कर्मचाऱ्यांच्या तसेच कुटुबातील निवृत्त वेतनधारकांना याचा लाभ दिला जात आहे. परंतु राज्य शासनाने १ जानेवारी २०२४मध्ये यामध्ये सुधारणा केली आहे. त्यामुळे ८० वर्षांवरील निवृत्ती वेतनधारकांना तसेच कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना २० ते १०० टक्के एवढी वाढ दिली जाणार आहे. (Pension)
निवृत्ती वेतनधारक तसेच कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना ज्या महिन्यात वयाची ८०, ८५, ९०, ९५, १०० वर्षे पूर्ण होतात. त्या महिन्यात १ तारखेपासून त्यांना वाढीव दराने ही वाढ दिली जाणार आहे. एचआर विभागाच्या नोंदीनसार महापालिकेतील ८० वर्षे व त्यावरील निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांची संख्या ७८९२ एवढी असून या वयोगटानुसार ही वाढ दिल्यास महिन्याला साडेतीन कोटींचा भार वाढणार आहे, तर वर्षांला सुमारे ४० कोटींचा भार तिजोरीवर पडणार आहे. परंतु आज ८० वर्षांवरील निवृत्त वेतन धारक व कुटुंब वेतन धारक यांची संख्या १७ हजारांच्या आसपास पोहोचली असल्याची माहिती मिळत आहे. (Pension)
(हेही वाचा- प्रभू श्रीरामांच्या खानदानाची लायकी काढणाऱ्यांना Sharad Pawar यांचा पाठिंबा?)
वय वर्षे ८० वरील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारीत दरात वाढ देण्यास प्रशासकीय मंजुरी मिळाल्याने याबाबत लवकरच याची परिपत्रक जारी केले जाणार आहे. ही वाढ १ जानेवारी २०२४ पासून पूर्वलक्षी प्रभावाने दिली जाणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात याची अंमलबजावणी करताना थकबाकीची रक्कमही निवृत्तीवेतन धारकांना आणि कुटुंब निवृत्त वेतनधारकांना दिली जाणार आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात हे परिपत्रक काढले जाईल आणि ऑक्टोबर महिन्यात या वाढीसह निवृत्त वेतन दिले जाईल अशी माहिती मिळत आहे. (Pension)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community