युपी-बिहारींना आता मुंबई नकोशी! काय आहे कारण?

मुंबईत खर्च सर्वाधिक असून, जर हाताला काम नसेल तर रोजचा खर्च तरी कसा भागवायचा, असा प्रश्न देखील परप्रांतीयांसमोर आहे.

83

मुंबई… कुणी हिला मायानगरी म्हणतं, तर कुणी मुंबापुरी. मुंबईने सर्वांना सामावून घेतले आहे. मुंबईने आजवर अनेकांना आसरा दिला, म्हणूनच मुंबईकडे सर्वच जण आकर्षिले गेले. युपी, बिहारमधील सर्वाधिक लोक रोजगारासाठी मुंबईत येतात. मात्र, आता हीच लाडकी मुंबई युपी-बिहारींना नकोशी झाली आहे. त्याचे कारण म्हणजे मुंबईवर असलेले कोरोना संकट. कोरोनाची पहिली लाट असो वा दुसरी लाट, सर्वाधिक कोरोना रुग्ण हे मुंबईत सापडले आहेत. याचमुळे अनेकांनी मुंबई सोडून गावी जाणे पसंत केले. यामध्ये सर्वाधिक समावेश आहे तो युपी बिहारमधील नागरिकांचा.

टॅक्सी-रिक्षावाले अजूनही परतेनात…

मुंबईच्या रस्त्यावर ज्या रिक्षा-टॅक्सी धावतात त्या सर्वाधिक युपी आणि बिहारी चालवतात. मात्र जसे मुंबईत कोरोनाचे संकट आले, तसे काहींनी आपल्या गावी जाणे पसंत केले. जवळपास 80 टक्के रिक्षा आणि टॅक्सी चालक हे आपल्या गावीच असून, जोवर मुंबई पूर्वपदावर येत नाही तोवर आम्ही आमच्या गावीच राहू, असे काही रिक्षा आणि टॅक्सी चालक सांगत आहेत. एवढेच नाही तर जे टॅक्सी-रिक्षा चालक मुंबईत आहेत त्यांचा देखील धंदा मंदावला आहे.

(हेही वाचाः पुण्यात सोमवारपासून पुन्हा निर्बंध! कसे आहेत नियम?)

मुंबई सोडण्याचे हेही आहे कारण?

मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. पण कोरोना संकटामुळे तसेच स्थानिक प्रशासनाकडून वारंवार लावण्यात येणाऱ्या निर्बंधांमुळे त्याचा फटका व्यवसायावर देखील बसत आहे. याचमुळे मुंबईत हाताला काम नसेल तर नुसते बसून तरी काय करणार, असे म्हणून अनेकांनी आपल्या गावी जाणेच पसंत केले आहे. तसेच मुंबईत खर्च सर्वाधिक असून, जर हाताला काम नसेल तर रोजचा खर्च तरी कसा भागवायचा, असा प्रश्न देखील परप्रांतीयांसमोर आहे.

अनेकांना भाडे भरणेही परवडेना

अनेक परप्रांतीय हे भाड्याने दुकान, टॅक्सी, रिक्षा घेऊन व्यवसाय करत आहेत. मात्र लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवसाय ठप्प झाल्याने भाडे भरणे देखील परवडत नसल्याने, अनेकांनी आपल्या गावचा रस्ता धरला आहे. तसेच काहींनी तर आपले संपूर्ण कुटुंब गावी सोडून आता ते मुंबईत छोटा व्यवसाय करू लागले आहेत.

(हेही वाचाः दोन दिवसांचे अधिवेशन कोरोनासाठी की बचावासाठी?)

मी मागील दहा वर्षांपासून भाड्याने रिक्षा चालवत होतो. मात्र गेल्या वर्षीच्या लॉकडाऊन पासून मी माझ्या गावी आलो आहे. जोवर परिस्थिती पूर्वपदावर येत नाही तोवर मी गावी थांबेन.

 

-विनय दुबे, रिक्षा चालक

मी मागील वर्षभरापासून गावी आहे. गावी देखील हाताला काम मिळेनासे झाले आहे. तसेच मुंबईत यायचे म्हटले तर कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे नेमकं करायचं तरी काय असा प्रश्न पडला आहे. मुंबईत यायची खूप इच्छा आहे पण हाताला काम नाही तर येऊन तरी काय करणार, हा खरा प्रश्न आहे.

-मिश्राजी…

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.