मुंबईत परवडणारे घर खरेदी करताय? तर हे वाचाच!

82

मुंबईसारख्या शहरात हक्काचं घर असणं ही प्रत्येकाची इच्छा असते. प्रत्येक व्यक्ती आपल्या ड्रिम होमसाठी विविध स्वप्न रंगवत असतो. मध्यंतरी कोरोना लॉकडाऊनच्या काळात घर खरेदी करण्याचा वेग काही प्रमाणात मंदावला होता. आता मात्र कोरोनाची लाट हळूहळू ओसरत चालली आहे त्यामुळेच मुंबईकरांनी पुन्हा एकदा हक्काचे घर घेण्याकडे मोर्चा वळवला आहे. पण सद्य स्थितीत चित्र काहीसे वेगळे असून आलिशान, मोठ्या घरांपेक्षा मुंबईकर परवडणारी घरे विकत घेण्यास अधिक प्राधान्य देत आहेत.

( हेही वाचा : उन्हाळ्यात फिरायला जाताय? बॅग पॅक करताना या गोष्टी नक्की सोबत ठेवा… )

मुंबईकर परवडणारी घरे विकत घेण्यास अधिक प्राधान्य देत आहेत. कोलकाता, मुंबई महानगर भागात आलिशान घरांच्या विक्रीत १५ ते १६ टक्के घट झाली आहे. तर, परवडणाऱ्या घरांच्या विक्रीत वाढ झाल्यामुळ, परवडणाऱ्या घरांची उपलब्धता २१ टक्क्यांनी कमी झाली आहे.

परवडणाऱ्या घरांची उपलब्धता

  • २०२० ( पहिल्या तिमाहीत) – २ लाख ३४ हजार ६००
  • २०२१ ( पहिल्या तिमाहीत) – २ लाख १४ हजार ६३०
  • २०२२ ( पहिल्या तिमाहीत) – १ लाख ८६ लाख १५०

विकल्या न गेलेल्या आलिशान घरांची संख्या

  • २०२० ( पहिल्या तिमाहीत ) – २४ हजार ३७०
  • २०२१ ( पहिल्या तिमाहीत ) – २३ हजार ९५०
  • २०२२ ( पहिल्या तिमाहीत ) – २० हजार ४८०
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.