मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याला परवानगी; पालिका निवडणुकीसाठी करणार शक्तिप्रदर्शन?

143

मुंबईतील शिवतीर्थावर होणाऱ्या 2 एप्रिल रोजी मनसेच्या गुडीपाढवा मेळाव्याला महापालिकेकडून अटी-शर्थींसह परवानगी दिली आहे. 2 एप्रिल रोजी होणाऱ्या मनसेच्या गुडीपाढवा मेळाव्यातील कार्यक्रमाला संध्याकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होत असल्याने या मेळाव्याच्या निमित्ताने मनसे प्रचंड शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. यासह कोरोना संकटानंतर दोन वर्षानंतर पहिल्यांदाच मनसेचा मुंबईत पाडव्या निमित्ताने मेळावा होणार असल्याने साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

राज यांच्या निशाण्यावर कोण?

यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आगामी महापालिकेच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकणार असल्याचे संकेत आहेत. पुण्यातील सभेत राज ठाकरे यांनी त्यांची तोफ पाडवा मेळाव्यात धडाडणार असल्याचे खुलं जाहीर केले होते. त्यामुळे राज यांच्या या भाषणाची सर्वांनाच उत्सुकता लागली असून या मेळाव्यात राज यांच्या निशाण्यावर कोण असणार याकडे सर्वांचं मनसेप्रेमींचे लक्ष लागले आहे.

(हेही वाचा – शिवतीर्थावर महाराजांच्या साक्षीने राज ठाकरेंनी दिली मनसैनिकांना ‘ही’ शपथ)

विरोधकांसमोर मनसेचं आव्हान

दरम्यान, महापालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने जय्यंत मोर्चेबांधणीची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी मुंबईसह ठाणे, पुणे आणि नाशिक महापालिकांच्या निवडणुकीचा स्वतः आढावा घेत असून या ठिकाणच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या आहेत. तसेच काही ठिकाणी पक्ष संघटनेत फेरबदलही केले आहेत. मनसेनेही मरगळ झटकून निवडणुकीची मोर्चेबांधणीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे या महापालिका निवडणुकांमध्ये विरोधकांसमोर मनसेचं आव्हान असण्याचे चिन्ह आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.