तरुणीने ज्या दुकानातून सँडल विकत घेतली होती, त्या दुकानाचा सर्वात अगोदर शोध घेण्यात आला, त्यानंतर दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता या तरुणीसोबत आलेल्या व्यक्तीची माहिती मिळवून त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने या तरुणीच्या खुनाची कबुली दिली, जिम ट्रेनर असलेल्या या तरुणाला त्याच्या सहकाऱ्यासोबत पोलिसांनी अटक केली.
(हेही वाचा – शेवाळेंकडून आदित्य ठाकरे टार्गेट! सुशांत सिंह राजपूत प्रकरणी संसदेत गंभीर आरोप)
नवी मुंबईतील धामणी गावाजवळ असणारी गाढी नदीच्या पात्रात पनवेल तालुका पोलिसांना १४ डिसेंबर रोजी एका तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. नदीजवळच शोध घेतल्यानंतर पोलिसांना लेडीज सँडल आणि काही वस्तू मिळून आल्या होत्या. हा खुनाचा प्रकार असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. परंतु मृत तरुणीची ओळख पटत नसल्यामुळे ही तरुणी कोण कुठली याबाबत काहीही माहिती पोलिसांना मिळाली नाही. तालुका पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता, हत्येचा तपास नवी मुंबई गुन्हे शाखा कक्ष २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील आणि त्यांच्या पथकाने सुरू केला.
“घटनास्थळी आम्हाला एक लेडीज सँडल मिळून आली होती, सँडल ही विशिष्ट बँडची असल्यामुळे चप्पलचे शोरूमचा शोध घेण्यात आला, हे शोरूम नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे मिळून आले. दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता मृत तरुणी एका तरुणासोबत काही दिवसांपूर्वी येऊन गेल्याचे फुटेजमध्ये आढळून आले. या तरुणीसोबत असलेल्या तरुणाचा शोध घेतला असता हा तरुण एका व्यायाम शाळेत जिम ट्रेनर असल्याची माहिती मिळाली” असे वरिष्ठ
पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी दिली.
पोलिसांनी या जिम ट्रेनरची माहिती काढली असता तो देवनार येथे राहणारा रियाज समद खान (३६) याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली असता उर्वशी वैष्णव (२७) असे मृत तरुणीचे नाव असून ती कोपरखैरणे येथे राहण्यास होती. उर्वशी ही रियाज याची प्रेयसी होती, ती रियाजकडे लग्नासाठी तगादा लावत होती याकरणावरून रियाजने इम्रान इस्माईल शेख (२८) याच्या मदतीने उर्वशी हिची तिच्याच बोलेनो मोटारीत गळा आवळून हत्या केली, त्यानंतर तिचा मृतदेह पनवेल येथील धामणी गावाजवळील गाढी नदीच्या पात्रात फेकून दिला होता अशी माहिती मारेकरी रियाज याने पोलिसांच्या चौकशीत दिली. गुन्हे शाखा २ च्या पथकाने या हत्येची उकल करून दुसरा आरोपी इम्रान याला देखील अटक केली आहे.
Join Our WhatsApp Community