पीट बेस्ट (Pete Best) यांना अनेक लोक ओळखतात. जगभरात त्यांचे लाखो चाहते आहेत. भारत देशातही त्यांचे अनेक चाहते आहेत. त्यांचं खरं नाव रॅन्डॉल्फ पीटर बेस्ट असे आहे. त्यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९४१ रोजी मद्रास येथे झाला. (Pete Best) हे एक इंग्लिश संगीतकार आहेत.
पीट बेस्ट यांनी १९६० ते १९६२ दरम्यान द बीटल्ससाठी ड्रमर म्हणून काम केले आहे. पुढे हा बँड जगभरात प्रसिद्ध झाला. मात्र Pete Best यांना त्याआधीच काढून टाकण्यात आलं होतं. झालं असं की १९६० मध्ये पीट बेस्ट यांना बीटल्समध्ये ड्रमर म्हणून काम करण्याची विनंती केली गेली. मात्र त्यांना नंतर काढून टाकण्यात आले. यामुळे त्यांना खूप दुःख झालं.
(हेही वाचा-Amol Palekar : अमोल पालेकर – गोलमाल चित्रपटाचे भन्नाट किस्से)
पीट बेस्ट यांनी ब्रिटनमध्ये २० वर्षे सिव्हिल सर्व्हिसमध्ये काम केले आणि स्वतःचा म्युझिक बॅंड तयार केला. त्यांचा जन्म भारतात झाला असला तरी ते चार वर्षांचे असताना त्यांचे कुटुंब इंग्लंडला स्थायिक झाले. त्यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. १९५९ दरम्यान पीट बेस्ट यांचा ब्लॅक बँड नावाचा आधीपासूनच स्वतःचा बँड होता.
बीटल्समधून निघाल्यानंतर त्यांनी २० वर्षांनंतर पुन्हा स्वतःचा बॅंड तयार केला. द पीट बेस्ट बॅंड असे नामकरण करण्यात आले. हा बॅंड खूप लोकप्रिय आहे. भारतातही त्यांचे चाहते आहेत आणि त्यांचा जन्म भारतात झाल्यामुळे त्यांना भारताविषयी जिव्हाळा आहे अशी कबुली त्यांनी दिली आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community