आर्यनला सत्र न्यायालयात ‘फटका’, उच्च न्यायालयात होणार का ‘सुटका’

155

मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणी आर्यन खान आणि त्याच्या दोन सहका-यांचा जामीन अर्ज बुधवारी विशेष एनडीपीएस न्यायालयाने फेटाळला. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आर्यन खानच्या वाट्याला निराशाच येत असल्याने आता आर्यन खानच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

जामीन अर्ज फेटाळला

कॉर्डिलिया क्रूझवर छापा मारत एनसीबीने 3 ऑक्टोबर रोजी कारवाई केली. या कारवाईत ड्रग्स बाळगल्या प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह आठ जणांना एनसीबीने ताब्यात घेतले होते. त्यानंतर आर्यन खानला जामीन मिळवून देण्यासाठी तीन वेळा विशेष एनडीपीएस न्यायालयात जामीन अर्ज करण्यात आला होता. पण तिन्ही वेळा जामीन अर्जावरील सुनावणी स्थगित करण्यात आली होती. त्यामुळे 20 ऑक्टोबर रोजी आर्यनला जामीन मिळेल, असे अनेकांचे मत होते. पण हा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे आर्यनला सोडवण्यासाठी आता उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

(हेही वाचाः आर्यनचे ‘खान’पान कोठडीतच… जामीन अर्ज फेटाळला)

असा आहे घटनाक्रम

  • 3 ऑक्टोबर रोजी कारवाई करत एनसीबीने कॉर्डिलिया क्रूझवरुन आर्यन खान, मूनमून धमेचा, अरबाज मर्चंट यांच्यासह आठ जणांना ताब्यात घेतले.
  • 4 ऑक्टोबर रोजी न्यायालयासमोर हजर करण्यात आल्यानंतर या तिघांची 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी वाढवण्यात आली.
  • 7 ऑक्टोबर रोजी आर्यन खानसह आठ जणांना किल्ला महानगर दंडाधिकारी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
  • 14 ऑक्टोबर रोजी या तिघांच्याही जामीन अर्जावरील सुनावणी सत्र न्यायालयाने 20 ऑक्टोबरपर्यंत राखून ठेवली.
  • 20 ऑक्टोबर रोजी आर्यन खान, मूनमून धमेचा, अरबाज मर्चंट यांचा जामीन अर्ज विशेष एनडीपीएस न्यायालयाने फेटाळला.

(हेही वाचाः नवाब मलिकांनी कोणता केला नवा दावा? वाचा…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.