गेल्या आठवड्यापासून इंधन दरवाढ होत आहे. पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील कच्च्या तेलाचे भाव वाढले आहेत. त्यामुळे भारतातील पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. ही दरवाढ सुरुच आहे. देशात पाच राज्यांच्या निवडणुका होईपर्यंत इंधनाचे दर स्थिरावले होते. त्यात कोणताच बदल झाला नव्हता.
( हेही वाचा : आयकर विभागासाठी महापालिका लागली कामाला )
तज्ज्ञांची भविष्यवाणी
परंतु पेट्रोल-डिझेलचे आताचे वाढते दर पाहून सर्वसामान्यांना चांगलाच घाम फुटला आहे. दिल्लीत पेट्रोल १०५.४१ रुपये प्रति लीटर तर डिझेलची किंमत ९६.६७ रुपये प्रति लीटर आहे. तसेच तज्ज्ञांच्या मते डिझेलच्या दरात अजूनही सुमारे २५ रुपयांची वाढ होऊ शकते तर पेट्रोलच्या किमती २२ रुपयांपर्यंत वाढू शकतात.
भारतात तेलाच्या किमती ४ महिन्यांपासून स्थिर होत्या. १३७ दिवस तेलाच्या किमती वाढल्या नव्हत्या कच्च्या तेलाच्या किमती नोव्हेंबरमधील ८० डॉलर प्रति बॅरलच्या दरावरून मार्चमध्ये १३९ प्रति बॅरल या विक्रमी उच्चांकावर गेल्याने तेल कंपन्यांवर २.२५ अब्ज (१९,००० कोटी) बोजा पडला आहे. म्हणूनच ही वाढ होत आहे. डिझेलच्या दरात प्रति लिटर १३.१ ते २४.९ रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी, पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर १०.६ ते २२.३ रुपयांची वाढ निश्चित असल्याचे मानले जात आहे. असे कोटक सिक्युरिटीच्या अर्थतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community