भारतात इंधन ‘पेटले’, म्हणून भारतीय ‘या’ देशात पळत ‘सुटले’! मिळतंय स्वस्त इंधन

सरकारनेही 100 लिटरपर्यंतचे इंधन घेऊन जाण्यास परवानगी दिल्यामुळे या हुशार लोकांचा चांगलाच फायदा होत आहे.

79

देशात पेट्रोल आणि डिझेलचे भाव सातत्याने पेटत असल्यामुळे गाडीत इंधन भरताना खिसा मात्र रिकामा होत आहे. टाकीत पेट्रोलचा एक एक थेंब पडताना वाढणा-या मीटरमुळे आपल्याला टाकीचे घाव बसतात. आता इंधन जर धन खात असेल तर कुटुंबप्रमुख धन्यानं काय करायचं? आहे की नाही डोस्क्याला ताण? पण आता काय घेतलीया वाहनासी भरावे इंधन.

पण आपल्या देशात काय जुगाडू लोकांची कमी आहे होय? प्रॉब्लेम आला की आपल्याकडे सोल्यूशन लगेच तयार असतं. तर अशाच या इंधन दरवाढीच्या प्रॉब्लेमवर सुद्धा काही बुद्धीमान लोकांनी एक सोल्यूशन शोधून काढलं आहे. जेव्हा घरात कोणी असतं आजारी, तेव्हा धाऊन येतात सख्खे शेजारी… हाच खरा शेजारधर्म. यानुसारच आता पेट्रोल दरवाढीवर उपाय म्हणून भारतातले काही महाभाग आपल्या शेजारी असलेल्या नेपाळची मदत घेत आहेत.

(हेही वाचाः मायक्रोसॉफ्टच्या मदतीने केंद्र सरकार तरुणांना करणार ‘डिजीसक्षम’! इतक्या नोक-या मिळणार)

हे आहे सोल्यूशन?

नेपाळमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर भारतापेक्षा कमी आहेत. त्यामुळे नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोक हे गाड्यांच्या टाक्या फूल करण्यासाठी थेट सीमोल्लंघन करुन नेपाळला जात आहेत. नेपाळ सरकारनेही 100 लिटरपर्यंतचे इंधन घेऊन जाण्यास परवानगी दिल्यामुळे या हुशार लोकांचा चांगलाच फायदा होत आहे.

(हेही वाचाः भारत सरकारने बनवलेली सोन्याची नाणी कुठे मिळतात माहीत आहे का? वाचा)

इतकी आहे दरांत तफावत

नेपाळ आणि भारतातील इंधनांच्या दरात फार मोठी तफावत आहे. पेट्रोलच्या किंमतीत 26 ते 27 रुपये व डिझेलच्या किंमतीत साधारपणे 29 रुपयांचा फरक दोन्ही देशांमध्ये आहे. त्यामुळे सीमावर्ती भागातील लोकांनी ही युक्ती शोधून काढली आहे. कोरोना काळात नेपाळने आपल्या सर्व आंतरराष्ट्रीय बॉर्डर्स बंद केल्या होत्या. पण आता या बॉर्डर्स पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. याआधीही हे असे प्रकार सर्रासपणे सुरू होते.

(हेही वाचाः अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात पोहोचवले, तर केंद्र सरकार देणार पैसे! अशी आहे योजना)

पण मित्रांनो याला आपण चोरी म्हणू शकत नाही. हा संकटातून काढलेला सुलभ मार्ग आहे, भले तो दुस-या देशात का घेऊन जाईना. आता नेपाळ सुद्धा आपला मित्र देश आहे. शेवटी संकटकाळी जो मदत करतो तोच खरा मित्र नाही का?

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.