PF बॅलेन्स तपासणं झालं सोपं! EPFO पोर्टलवर जाऊन असा चेक करा बॅलेन्स

180

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात EPFO एक बचतीचे साधन म्हणून काम करते. १ ऑक्टोबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीसाठी ईपीएफ योगदानावर लागू होणारा व्याज दर ८.१ टक्के आहे. दरम्यान, अनेक ईपीएफ सदस्यांना आपला पीएफ बॅलन्स कसा तपासायचा हे माहित नसते… तुम्हाला माहित नसेल तर जाणून घ्या…

(हेही वाचा – EPFO खातेधारकांनो… तुमच्या खात्यात जमा झालेल्या व्याजाची रक्कम ‘या’ 4 पर्यायांद्वारे तपासा )

epfindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तुम्ही ही रक्कम तपासू शकतात. या संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला ई पासबुकवर जावे लागणार आहे. यानंतर तिथे तुमचे युजरनेम (UAN नंबर), पासवर्ड आणि कॅप्चा भरणं अनिवार्य असणार आहे.

असा तपासता येणार पीएफ बॅलन्स

  • सर्व प्रथम ईपीएफओ पोर्टलवर तुम्हाला भेट द्यावी लागणार आहे.
  • यानंतर Our Services या टॅबवर जाऊन ड्रॉप-डाऊन मेनूमधून For Employees हा पर्याय निवडा.
  • आता Services अंतर्गत Member passbook ऑप्शनवर क्लिक करा.
  • यानंतर तुम्हाला एक लॉगिन पेज दिसेल. अॅक्टिव्हेट झाल्यानंतर येथे तुमचा युनिव्हर्सल अकाऊंट नंबर आणि पासवर्ड टाकावा लागेल
  • यानंतर ‘Member ID’ सिलेक्ट करा आणि View Passbook वर क्लिक करा.
  • तुमचो पीएफ डिटेल्स स्क्रीनवर दिसेल.
  • यानंतर तुम्ही Download Passbook ऑप्शनवर क्लिक करून प्रिंट काढू शकता.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.