PFI विरोधातील कारवाईला हिंसक वळण; वाहनांची तोडफोड, भाजप कार्यालयावर हल्ला

147

पीएफआयने एनआयएच्या नेतृत्वाखाली विविध यंत्रणांनी गुरूवारी त्यांची कार्यालये, नेत्यांची घरे आणि इतर काही ठिकाणी टाकलेल्या छाप्यांचा निषेधार्थ आज २३ सप्टेंबर रोजी संप पुकारला आहे. पीएफआयने केरळमध्ये आज बंद पुकारला आहे.

(हेही वाचा – फर्स्ट क्लासच्या पासवर करा एसी लोकलमधून प्रवास, रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय)

या बंददरम्यान, केरळमधील तिरूवनंतपुरममध्ये कार आणि ऑटो रिक्षासारख्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. इतकेच नाही तर तामिळनाडूतील कोईम्बतूरमध्ये पीएफआयने सदस्यांच्या अटकेनंतर हिंसक निदर्शन केली आहे. यावेळी भाजपच्या कार्यालयावरही हल्ला करण्यात आला आहे. या घटनेनंतर भाजप कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एनआयए आणि ईडीचे हे छापे पीएफआयने देशातील दहशतवादी कारवायांना समर्थन केल्याच्या संदर्भात घातले आहे.

गुरूवारी एनआयए आणि इतर काही यंत्रणांनी १५ राज्यांमध्ये ९३ ठिकणी एकाच वेळी छापे टाकले आहे. यावेळी पीएफआयचे १०६ नेते आणि कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. केरळमध्ये सर्वाधिक २२ पीएफआय कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. यासर्व घटनेनंतर भाजपने केरळ युनिटने पीएफआय विरूद्ध कठोर पाऊलं उचलण्याची मागणी सरकारकडे केली आहे. तर पीएफआयने पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर केरळ पोलिसांनी राज्यात मोठी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.