मुस्लिमांना दहशतवादी बनवणारी पीएफआय

99

पीएफआय म्हणजेच पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या विविध संघटना आहेत. सरकारने पीएफआयबरोबरच त्याच्याशी संबंधित अनेक संघटनांवर बंदी घातली आहे. या सर्व संघटना विशेषत: तरुण, विद्यार्थी, महिला, इमाम, वकील तसेच काही मागासवर्गीय लोकांमध्ये आपला प्रभाव वाढवण्यासाठी, तसेच फंड जमा करण्याचे काम करत होत्या. अधिकाधिक तरुणांना संघटनेत आणून त्यांची माथी भडकवायची आणि त्यांना कट्टरतावादी बनवून देशातील लोकशाही संपुष्टात आणणे हा गुप्त हेतू पीएफआयचा होता.

त्यासाठी लोकशाहीचे नेतृत्व करणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींवर हल्ले करण्याचा त्यांचा मुख्य उद्देश होता. पीएफआयच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर ही संघटना सिमी आणि बांगलादेशातील जमातुल मुजाहिदीन या बंदी घातलेल्या संस्थांशी संबंधित आहे. या संस्थांशी पीएफआयच्या कार्यकर्त्यांचे जवळचे संबंध होते. इतकेच नाही तर या कार्यकर्त्यांचे इसिस या पाकिस्तानातील गुप्तचर संघटनेशी जवळचे संबंध असल्याचे समोर आले आहे.

काय होता पीएफआयचा अजेंडा?

काही वर्षांपूर्वी केरळमधील प्राध्यापकाचे पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी हात तोडले. त्याशिवाय १० लोकांची ठिकठिकाणी त्यांनी निर्घृण हत्या केली. ही सगळी कृत्ये करण्यामागे त्यांचा एकच उद्देश होता, तो म्हणजे लोकांमध्ये पीएफआयच्या नावाने दहशत निर्माण करणे. तसेच ही संस्था ज्या ठिकाणी युद्ध सुरु आहे, त्याठिकाणी माथी भडकवलेल्या तरुणांना पाठवत असत. जसे की, अफगाणिस्तान, सिरिया याठिकाणी अनेक मुसलमान तरुण लढत असल्याची माहिती अनेकदा समोर आली.

(हेही वाचाः पीएफआयवरील बंदीनंतर हिंदुत्ववादी नेत्यांना धमकीचे फोन)

दिल्ली, बंगळुरू येथे झालेल्या दंगली, तसेच देशभरात ज्या काही दंगली झाल्या त्यामागे पीएफआयचा हात असल्याचे अनेकदा समोर आले आहे. पीएफआय या संस्थेचे जे अकाऊंट होल्डर्स आहेत, त्यांची खाती जेव्हा तपासली गेली, त्यावेळी इनकम टॅक्स अधिकाऱ्यांना या खात्यात येणारे पैसे हे अवैधरित्या येत असल्याचे आढळले. त्यानंतर ही खाती देखील बंद करण्यात आली. देशात अशांतता निर्माण करण्याचा कट उद्ध््वस्त करण्यात आला आहे.

बंदी घातली नसती तर…

या संघटनेवर जर बंदी घातली गेली नसती तर अशाच प्रकारे पीएफआयने आणखी मोठ्या प्रमाणात घातपात करणे, लोकांमध्ये द्वेष पसरवणे, जातीय दंगली घडवणे, लोकांचे खून करणे, तसेच संपूर्ण देशात अस्वस्थता पसरवण्याचे काम चालूच ठेवले असते. त्यामुळे या सगळ्याचा विचार करुनच केंद्र सरकारने या संघटनेवर बंदी घातली आहे. पाकिस्तान, सौदी अरेबिया, मलेशिया, तुर्की यांसारख्या आखाती देशांकडून अशा संघटनांनांना प्रोत्साहन दिले जाते, तसेच वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते. या देशांकडून पीएफआय आणि त्याच्या सहकारी संस्थांना आर्थिक मदत केली जाते आणि विशेष म्हणजे या सगळ्यामागे पाकिस्तानचा सर्वात मोठा हात आहे.

(हेही वाचाः पीएफआयशी संबंधित इसमाच्या एसटीएफने आवळल्या मुसक्या)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.