‘हमको छेडो नहीं, हमको छेडेंगे तो हम छोडेंगे नहीं’ असा धमकीवजा इशारा देणाऱ्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेचा मुंब्रा अध्यक्ष अब्दुल मतीन शेखानी हा मुंब्रा येथून फरार झाला असून त्याचा मुंब्रा पोलिसांकडून कसून शोध घेण्यात येत आहे. परवानगी नसताना बेकायदेशीररित्या जमाव जमवून भडकावू भाषण केल्याप्रकरणी अब्दुल मतीन सह ३० ते ३५ जणांविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
( हेही वाचा : जरा जपून! सोशल मीडियावर पोस्ट टाकताय? मुंबई पोलिसांचा राहणार वॉच )
सभेसाठी कुठल्याही प्रकारची परवानगी नव्हती
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत कठोर भूमिका घेत सरकारला अल्टिमेटम दिला आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याविरुद्ध आवाज उठवल्यानंतर ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या मुस्लिम संघटनेचे मुंब्रा येथील अध्यक्ष अब्दुल मतीन शेखानी यांनी मुंब्रा येथे १५ एप्रिल रोजी नमाजानंतर मुस्लिम समुदायाला एकत्रित करून रस्त्यावर सभा घेत ‘हमको छेडो नहीं, हमको छेडेंगे तो हम छोडेंगे नहीं’ असा धमकीवजा इशारा देत भडकावू भाषण केले होते. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने या सभेसाठी कुठल्याही प्रकारची परवानगी घेतलेली नव्हती. विना परवानगी सभा घेऊन जमलेल्या समुदायासमोर भडकावू भाषण केल्याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी अब्दुल मतीन शेखानी सह ३५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अब्दुल मतीन शेखानी यांचा शोध घेतला असता ते भेटले नाहीत अशी माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community