PFI वर डिजिटल स्ट्राईक, संघटनेच्या ट्विटर अकाउंटवरही बंदी

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) विरोधातील कारवाईनंतर आता पीएफआयच्या अधिकृत ट्विटर अकाऊंट निर्बंध घालण्यात आले. गृह मंत्रालयाच्या तक्रारीवरून ट्विटर इंडियाने हे पाऊल उचलले आहे. बुधवारी केंद्र सरकारने पीएफआय आणि त्याच्याशी संलग्न कंपन्यांवर पाच वर्षांपर्यंत बंदी घातली. गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात सुरू असलेल्या छाप्यांमध्ये पीएफआयशी संबंधित 200 हून अधिक नेत्यांना अटक करण्यात आली आहे.

PFI चे ट्विटर अकाउंट (@PFIofficial) जे आज बंद झाले होते त्याचे जवळपास 81,000 फॉलोअर्स होते. ट्विटर इंडियाने पीएफआयचे अध्यक्ष ओएमए सलाम आणि सरचिटणीस अनीस अहमद यांची ट्विटर खातीही बंद केली आहेत. या दोघांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) छापेमारीत अटक केली.

(हेही वाचा – केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या नावाने फेसबुक अकाउंट उघडून केली पैशांची मागणी, गुन्हा दाखल)

या संस्थावरही झाली कारवाई

पीएफआय व्यतिरिक्त रिहॅब इंडिया फाउंडेशन (RIF), कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया (CFI), ऑल इंडिया इमाम कौन्सिल (AIIC), नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ ह्यूमन राइट्स ऑर्गनायझेशन (NCHRO), नॅशनल वुमन फ्रंट, ज्युनियर फ्रंट, एम्पॉवर इंडिया फाउंडेशन आणि रिहॅब फाउंडेशनसारख्या सहयोगी संघटनांवरही बंदी घालण्यात आली असल्याचे समोर आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here