गृह युद्धातून ‘पीएफआय’ला गाठायचे होते ‘२०४७’ लक्ष्य

97

केंद्र सरकारने ५ वर्षांसाठी पीएफआयसोबत २० संलग्न संस्थांवर बंदी घातली आहे. या संस्थेचा थेट पाकिस्तानातील गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंध होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संस्थेने २०४७ टार्गेट ठेवले आहे. या कालखंडात भारताला मुस्लिम राष्ट्र बनवण्याचा डाव होता, त्यासाठी देशात गृहयुद्ध करून हे लक्ष्य गाठायचे होते. या बाबतची ‘इंडिया २०४७’ नावाची पुस्तिका तपास यंत्रणेच्या हाती लागली आहे.

पीएफआयची दहशतवादी ब्लू प्रिंट

जुलै २०२२ मध्ये पटना येथून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या संशयितांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये ‘इंडिया २०४७’ नावाची पीएफआय पुस्तिका देखील होती, ज्यात २०४७ पर्यंत भारताला मुस्लिम देश बनवण्याची ‘दहशतवादी ब्लू प्रिंट’ होती. वेगवेगळ्या माध्यमातून इस्लाम धर्माचा प्रचार करून भारतीय स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवात म्हणजे २०४७ मध्ये संपूर्ण देश मुस्लिम राष्ट्र करण्याचे लक्ष्य ठेवण्याचा संदेश या पुस्तकातून देण्यात आला आहे. त्यानुसारच उच्चशिक्षित आरोपी हे शिबिरे, कार्यक्रमातून प्रशिक्षण देत होते.

(हेही वाचाः ‘सिमी’चेच दुसरे रूप पीएफआय)

सरकारविरूद्ध हिंसकपणे सूड उगवण्याचा निर्णय

देशभरात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) विरुद्ध धडक कारवाई सुरू आहे. मंगळवारी, २७ सप्टेंबर रोजी या संस्थेशी संबंधित २०० हून अधिक लोकांना देशातील वेगवेगळ्या राज्यांमधून ताब्यात घेण्यात आले. पीएफआयचे अधिकारी, सदस्य आणि कार्यकर्ते मुस्लिम तरुणांना कट्टरपंथी बनविण्यात आणि भरती करण्यात सामील होते. या तरुणांना आयएसआयएससारख्या दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्यासाठी ढकलले जात होते, असे पीएफआयविरूद्ध एनआयएच्या मेगा ऑपरेशनमध्ये दिसून आले.

एनआयए आणि ईडीने पीएफआयचे उच्च नेते आणि सदस्यांची घरे आणि कार्यालयांवर छापे टाकले, ज्यात संघटनेच्या सदस्यांनी दहशतवाद निधी, प्रशिक्षण शिबिरे याचे आयोजन केले होते, याचे पुरावे सापडले आहेत. आरोपी धर्माच्या आधारे विविध गटांमध्ये शत्रुत्व वाढविण्याच्या उद्देशाने हिंसक आणि दहशतवादी कृत्ये करण्यासाठी प्रशिक्षण देण्यासाठी शिबिरे आयोजित करीत होते, असा एनआयएने दावा केला. पीएफआयचा सरकारी संस्था, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते आणि संघटना यांना लक्ष्य करण्याचा उद्देश होता.

कट यशस्वी करण्यासाठी अशी होती रूपरेषा!

  • पीएफआय आणि त्याच्याशी संलग्न संघटनाकडून बेकायदेशीर कारवाया करत देशाच्या सुरक्षा आणि अखंडतेसाठी धोका निर्माण करणे.
  • देशाच्या शांतता आणि धार्मिक सौहार्दाला धोका निर्माण करणे, पीएफआय आणि त्याच्याशी संलग्न संघटनांना देशातील दहशतवादाचे समर्थन मिळवणे.
  • प्रतिबंधित सिमी संघटनेचे नेते, पदाधिकारी यांना संघटनेत सहभागी करून घेणे.
  • छुप्या पद्धतीने देशातील मुसलमानांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करणे, त्यातून त्यांना कट्टरवादी बनवणे.
  • परदेशातून येणारा निधी आणि वैचारिक पाठबळ याच्या सहाय्याने देशांतर्गत सुरक्षेला मोठा धोका निर्माण करणे.
  • संघटनेशी समविचारी संस्था निर्माण करणे, त्या विद्यार्थी, कामगार, स्त्रिया अशा विविध आघाड्यांवर कार्यरत करणे.
  • तरुण, विद्यार्थी, महिला, इमाम, वकील आणि समाजातील दुर्बल घटकांमध्ये संपर्क वाढवणे, त्यांना पीएफआयशी जोडणे.
  • देशात मुसलमानविरोधी मुद्दे निर्माण करून त्याअनुषंगाने सरकारविरोधात जनक्षोभ निर्माण करणे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.