- ऋजुता लुकतुके
फार्मा उद्योग हा देशातील विकासाची खूप मोठी संधी असलेलं उद्योग क्षेत्र मानलं जातं. आणि हैद्राबाद ही फार्मा राजधानीच मानली जाते. कारण, इथं फार्मा क्लस्टर या खास उभारलेल्या क्षेत्रात ५०० हून जास्त फार्मा कंपन्या आहेत. पण, एकीकडे शहरासाठी ही अभिमानाची गोष्ट असताना दुसरीकडे, शहराचं आरोग्यच या कंपन्यांमुळे बिघडतंय. म्हणजे फार्मा कंपन्या लोकांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी औषधं बनवतात. पण, इथं शहराचं आरोग्य त्यांच्यामुळे धोक्यात आलंय, हा विरोधाभास आहे. (Pharma Companies in Hyderabad)
या कंपन्यांकडून सोडलं जाणारं सांडपाणी सामावून घेता घेता शहर आणि राज्यातील नद्याच प्रदूषित झाल्या आहेत. आणि ही परिस्थिती दिवसेंदिवस आणखी बिघडणार आहे. (Pharma Companies in Hyderabad)
(हेही वाचा – Virat & Anushka Welcome Baby Boy : विराट आणि अनुष्काने केलं आपल्या दुसऱ्या अपत्याचं स्वागत)
शहरातील महत्त्वाच्या फार्मा कंपन्या पाहूया,
डिव्हिज् लॅब
१९९० मध्ये स्थापन झालेली ही कंपनी जागतिक स्तरावर जेनेरिक औषधं बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. कंपनीने बनवलेली औषधं १०० च्या वर देशांत निर्यात होतात. फार्मा उद्योगात कस्टम सिंथेसिस सेवाही ही कंपनी पुरवते. कंपनीची वार्षिक उलाढाल ही १.२ अब्ज अमेरिकन डॉलरच्या घरात आहे. (Pharma Companies in Hyderabad)
डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज्
डॉ. रेड्डीज ही जागतिक स्तरावरील एक आघाडीची कंपनी आहे. तिचा वार्षिक महसूल सरासरी २.९ अब्ज अमेरिकन डॉलर इतका आहे. गॅस्टो-इंटरोलॉजी, कार्डिओव्हस्क्युलर, डायबिटोलॉजी, आँकोलॉजी आणि वेदनाशमन या क्षेत्रात कंपनीनं केलेलं संशोधन जगात नावाजलं जातं. कंपनीत २५,००० च्या वर कर्मचारी काम करतात. (Pharma Companies in Hyderabad)
अरबिंदो फार्मा
अरबिंदो फार्मा जेनरिक तसंच फार्मासुटिकल औषधं बनवण्यात आघाडीवर असलेली ही कंपनी १२५ देशांमध्ये आपली उत्पादनं निर्यात करते. न्युरोसायन्स, अँटीबायोटिक्स, अँटीरेट्रोव्हायरल्स, कार्डिओव्हस्क्युलर, मज्जासंस्था, अँटी ॲलर्जिक या क्षेत्रातील संशोधनात कंपनी आघाडीवर आहे. कंपनीकडे ५०० च्या वर पेटंट आहेत. जागतिक स्तरावर ॲस्ट्राझिनिका आणि फायझर सारख्या कंपन्यांबरोबर या कंपनीने सहकार्य करार केले आहेत. (Pharma Companies in Hyderabad)
(हेही वाचा – पुणे पोलिसांची Drugs विरोधात सलग ४थ्या दिवशी कारवाई; बुधवारी १२०० कोटींचे अंमली पदार्थ जप्त)
लॉरस लॅब
लॉरस लॅब ही फार्माबरोबर बायोटेक कंपनी आहे. अँटीरेट्रोव्हायरल, हिपेटाईटिस सी तसंच ऑकोलॉजिकल सर्जरींमध्ये ही कंपनी संशोधन करते. कंपनीचा सरासरी वार्षिक महसूल हा ६५० दशलक्ष अमेरिकन डॉलर इतका आहे. आणि कंपनीकडे २०० च्या वर पेटंट आहेत. (Pharma Companies in Hyderabad)
लाँझा
लाँझा ही १८६७ साली स्थापन झालेली जागतिक स्तरावरील कंपनी आहे. उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी लागणारी अवजारं बनवण्यात या कंपनीचा हातखंडा आहे. शिवाय एखादं औषध जेल, स्प्रे, स्प्रिंकल आणि कॅप्सुल अशा वेगवेगळ्या स्वरुपात बनवणं ही कंपनीची खासियत आहे. (Pharma Companies in Hyderabad)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community