…म्हणून कोरोना काळात औषध पुरवठादारांनी दिली थेट आत्महत्येची धमकी!

सरकारी रुग्णालयातील औषध पुरवठ्याची ९० टक्के जबाबदारी पेलणा-या हाफकिन औषध निर्मिती कंपनीने इतर औषध पुरवठादारांची गेल्या वर्षापासून थकितबाकी ठेवली, त्यामुळे निराश झालेल्या औषध पुरवठादारांनी थेट आत्महत्येची धमकी दिली आहे. मंगळवारी औषध पुरवठादारांनी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनालयाच्या सचिवांना पत्र लिहून थकित रक्कम त्वरित देण्याची मागणी केली.

९० कोटींची रक्कम अद्याप थकित

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनालयाकडून राज्यातील अठरा सरकारी रुग्णालयाची देखभाल तसेच कामकाज पाहिले जाते. या सरकारी रुग्णालयांना औषध पुरवठ्याच्या कामकाजाची ९० टक्के पाहण्याची जबाबदारी हाफकिन संस्थेला दिली आहे. मात्र हाफकिन संस्थेने या औषध पुरवठादारांच्या देयकाची तब्बल ९० कोटींची रक्कम अद्यापही दिलेली नाही. नुकतेच मुंबईतील जेजे समूह रुग्णालयातील औषध तुटवड्याचे प्रकरण समोर आले होते.

(हेही वाचा – )

‘पुन्हा हाफकिनसोबत व्यवहार नाही’

या प्रकरणीही हाफकिनकडूनच पुरेसा औषध पुरवठा तसेच देय रक्कमेमुळे होणारी समस्या उघडकीस आली होती. रुग्णांच्या नातेवाईकांनाच औषधे आणण्यासाठी वणवण फिरावे लागत होते. त्रासलेल्या औषध पुरवठादारांनी देय रक्कम मिळाल्यानंतर पुन्हा हाफकिन संस्थेसोबत व्यवहार करायचा नाही, असा एकमताने निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here