ग्लोबल टेक्नॉलॉजी फर्म फिलिप्सने तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले असून, कंपनीची उत्पादकता वाढवण्यासाठी 4,000 नोकऱ्या कमी करणार असल्याचे म्हटले आहे. फिलिप्सने एका निवेदनात म्हटले आहे की, बाजाारातील आव्हानांमुळे तिसऱ्या तिमाहीतील विक्रीवर परिणाम झाला आहे. 12 ऑक्टोबर रोजी कंपनीच्या माहितीनुसार, एकूण विक्री 4.3 अब्ज युरो झाली, जी गेल्या तिमाहीच्या तुलनेत 5 टक्क्यांनी घसरली आहे.
(हेही वाचा – “प्रतिज्ञापत्र हे सगळं स्वत:च्या समाधानासाठी..” फडणवीसांच्या ‘त्या’ विधानाने ठाकरे गटाची कोंडी?)
फिलिप्सचे सीईओ रॉय जेकब्स यांनी एका निवेदनात म्हटले की, उत्पादकता वाढवण्याच्या प्रक्रियेत, जागतिक स्तरावर साधारण 4,000 कर्मचारी संख्या तात्काळ कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा एक कठीण परंतु आवश्यक निर्णय आहे. परंतु प्रभावित सहयोगींच्या संबंधात अत्यंत आदराने त्याची अंमलबजावणी केली जाईल.
फिलिप्स कंपनीच्या नफ्यात वाढ करण्यासाठी आणि कंपनीची कार्यक्षमता वाढविण्यासाठी ही पाऊले उचलली आहेत. तसेच कंपनीच्या भागदारकांना देखील लाभांश हवा असतो, त्यामुळे कंपनीच्या फायद्यासाठी आम्हाला असे निर्णय घ्यावे लागतात. उत्पादनात विक्रीतील वाढत्या समस्या, महागाईचा दबाव, चीनमधील कोविड परिस्थिती आणि रशिया-युक्रेन युद्ध यामुळे फिलिप्सच्या तिमाहीतील कामगिरीवर परिणाम झाला.
Join Our WhatsApp Community