मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 11 ने मुंबईतील एका फोन आणि व्हिडिओ सेक्स कॉल सेंटरचा पर्दाफाश केल्याचे समोर आले आहे. यावेळी मुंबई गुन्हे शाखेच्या युनिटने सेक्स कॉल सेंटरमधून तब्बल 17 महिलांची सुटका केली. यासह कॉल सेंटरच्या मालकाला अटक केली आहे. सुटका करण्यात आलेल्या महिलांपैकी काही विद्यार्थिनी होत्या.
(हेही वाचा – राज्याच्या सत्तेबाबत शरद पवारांचं मोठं विधान! म्हणाले…)
दरम्यान, या कॉल सेंटरचा सेक्सटोर्शन रॅकेटशी काही संबंध आहे का, याचा तपास मुंबई पोलिसांकडून सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कॉल सेंटरमध्ये महिलांकडून अश्लील काम करून घेतले जात होते. हे काम फोन कॉल्सवरून किंवा व्हिडीओच्या माध्यमातून महिलांकडून करून घेतले जात होते. या कामासाठी 270 रूपयांपासून ते 10 हजार रूपयांपर्यंत रक्कम आकारली जात असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने एक अॅप्लिकेशन तयार केले होते, अॅप्लिकेशनच्या माध्यमातून तो ग्राहकांना त्याच्या कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या महिलांशी जोडायचा आणि त्यानंतर कॉलरच्या मागणीनुसार फोन कॉलवर किंवा व्हिडीओवरून हे काम केले जायचे. या महिन्याच्या सुरुवातीला मुंबई पोलिसांनी नवी मुंबईतील छाप्यांमध्ये वेश्याव्यवसायात ढकलल्या गेलेल्या 17 महिलांची सुटका केली होती आणि दलाल म्हणून काम करणाऱ्या 9 जणांना अटक केली होती.
Join Our WhatsApp CommunityPhone & video sex call centre busted by Unit 11 of Mumbai Crime branch. 17 women, some of whom were students, were rescued & owner of the call centre was arrested. Charges started from Rs 270 & went up to Rs 10,000. Probe on to find sextortion link, if any: Mumbai Police
— ANI (@ANI) August 30, 2022