अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेमुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. देशभरातील सर्व राम मंदिरांत यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. राम मंदिराची काही नवीन छायाचित्रेही प्रसिद्ध झाली आहेत२२ जानेवारी हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात नोंदवला जाईल. अनेक वर्षांनी रामलल्ला (Ram Mandir) अयोध्येतील त्यांच्या भव्य राम मंदिरात निवास करतील. (Photo Gallery)
२२ जानेवारी हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात नोंदवला जाईल. अनेक वर्षांनी रामलल्ला अयोध्येतील त्यांच्या भव्य राम मंदिरात निवास करतील.
या नेत्रदीपक आणि ऐतिहासिक सोहळ्याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे.
मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला जगभरातील रामभक्त आपली सेवा प्रभु श्रीरामाच्या चरणी अर्पण करतील.
राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याची तयारी घरोघरी सुरू आहे. त्यामुळे दिवे, सजावटीचे साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होत आहे.
अयोध्येत राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. येथे संख्येने भाविक दाखल होणार असल्याने प्रशासन आणि मंदिर ट्रस्टकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहे.
अयोध्या राम मंदिराचे कोषाध्यक्ष स्वामी श्रीगोविंद देवगिरी महाराज, गणेश्वर शास्त्री द्रवीड, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आचार्य लक्ष्मीकांत दिक्षीत, केशव गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल केले यांनी धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथील बिपीन कासार व गावातील काही कारागिरांनी २०० तांब्याचे कलश आतापर्यंत बनवले आहेत.
लंडनमधल्या रामभक्तांनी तिथल्या राम मंदिरांमध्ये ‘राम शिरा’ प्रसाद म्हणून वाटण्याचे ठरवले आहे. नागपूर येथील प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी अयोध्येत तब्बल ७ हजार किलो राम हलवा तयार करणार आहेत. प्रभु श्रीरामांना या हलव्याचा म्हणजेच शिऱ्याचा नैवेद्य दाखवल्यानंतर अयोध्येत येणाऱ्या दीड लाख रामभक्तांना प्रसाद दिला जाणार आहे.
Join Our WhatsApp Community