आपल्या आवडीनुसार काम मिळणे हे खूप कमी लोकांच्या नशिबात असते. आयुष्याचा रहाटगाडा चालवण्यासाठी कितीतरी लोक आपल्या आवडीनिवडी बाजूला सारतात. पण काहीजण असेही असतात जे आपल्या आवडींना पॅशनमध्ये बदलतात आणि त्या पॅशनसाठी हे लोक वाट्टेल ते धाडस करायला तयार असतात. हे ऐकायला थोडे विचित्र वाटत असेल, पण या जगात असे कितीतरी लोक आहेत जे आपली पॅशन जपण्यासाठी कोणत्याही थराला जातात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अवलियाबद्दल सांगणार आहोत.
ही गोष्ट आहे इंडोनेशिया येथील स्टेनली आर्यांटो नावाच्या एका चौतीस वर्षांच्या तरुणाची. स्टेनली मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून काम करत होता. 2018 साली स्वतःची फोटोग्राफीची पॅशन जपण्यासाठी छप्पन्न लाख रुपये पगाराची नोकरी त्याने सोडली आणि तो जगाची सफर करायला निघाला. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही. स्टेनलीने आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, अमेरिका, दक्षिण कोरिया, सिंगापूर यांसारख्या सव्वीस देशांचा दौरा केला आहे. त्याची फोटोग्राफी खरोखरच अप्रतिम आहे. त्याने काढलेले सर्व फोटो खूपच सुंदर असतात. नेचर फोटोग्राफी हे त्याचे वैशिष्ट्य आहे.
View this post on Instagram
(हेही वाचा PM Modi : पॅसिफिक देशांशी भारताचे संबंध सुधारण्यासाठी मोदींचे प्रयत्न)
सोशल मीडियावर त्याने केलेल्या फोटोग्राफीचं खूप कौतुक होतं. हजारोंच्या संख्येने कमेंट्स आणि लाईक्स येतात. काही लोकांच्या मते एवढी चांगली नोकरी सोडणे हा मूर्खपणा आहे. पण तरीसुद्धा स्टेनलीच्या फोटोंची स्तुती करताना लोक थकत नाहीत. स्टेनली फोटोग्राफी करूनच पैसे कमावतो आणि त्याच कमावलेल्या पैशांनी तो पुढची सफर करायला निघून जातो.
स्टेनलीने आपल्या सफरीदरम्यान अप्रतिम आणि रोमहर्षक स्थळांना भेट देऊन आनंद घेतला आहे. जसे की, बाली येथे सर्वात उंच ज्वालामुखीवर जाऊन मिल्की वे पाहणे, तसेच ऑस्ट्रेलिया येथे माऊंट सॅडलबॅक वर चढाई करणे इत्यादी. स्टेनली म्हणतो की, ‘धूमकेतू निओवाइस पाहणे हा माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण होता. कारण हा धूमकेतू यापुढे ६८०० वर्षे दिसणार नाही.’
Join Our WhatsApp Community