बिहारमधील अजब प्रकार; परीक्षा ओळखपत्रांवर विद्यार्थ्यांच्या फोटोऐवजी झळकले पंतप्रधान मोदी, धोनीचे फोटो

99

बिहारमधील ललितनारायण मिथिला विद्यापीठात अजब प्रकार घडला आहे. या विद्यापीठाने परीक्षार्थींना दिलेल्या ओळखपत्रांपैकी काहींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, महेंद्रसिंह धोनी, बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांची छायाचित्रे आढळली आहेत. विद्यार्थ्यांनीच हा खोडसळपणा केल्याचा संशय आहे. परीक्षा ओळखपत्रांवर पंतप्रधान व अन्य मान्यवरांची छायाचित्रे कशी झळकली याबाबत विद्यापीठाचे रजिस्ट्रार मुश्ताक अहमद यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

( हेही वाचा : नवरात्रीसाठी मुंबईकरांना ‘बेस्ट’ गिफ्ट! BKC ते ठाणे सुरू होणार प्रिमियम बससेवा )

गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई होणार 

बिहारमधल्या मधुबनी, समस्तीपूर, बेगूसराय जिल्ह्यांतील महाविद्यालयात बी.ए. अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षांतील विद्यार्थ्यांना परीक्षेची ओळखपत्र देताना हा अजब प्रकार घडला आहे. इंटरनेटच्या माध्यमातून ही ओळखपत्रे जारी केली जातात यास विशिष्ट लॉगिन असते. या प्रक्रियेतच काही विद्यार्थ्यांनी स्वत:ऐवजी पंतप्रधानांसहित काही मान्यवरांची छायाचित्रे ओळखपत्रांवर झळकवण्याचा खोडसाळपणा केला असण्याची शक्यता आहे असे गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असेही मुश्ताक अहमद म्हणाले.

काही वर्षांपूर्वी मुजफ्फरनगर येथे एका विद्यार्थ्याने आपल्या परीक्षा ओळखपत्रावर आई व वडिलांचे नाव अनुक्रमे इमरान हाश्मी व सनी लिओनी असे लिहिले होते. यावेळी खूप गदारोळ झाला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.