Fact Check : ‘प्रधानमंत्री बेरोजगार भत्‍ता योजने’तंर्गत तरुणांना दरमहा मिळणार ६००० रुपये?

134

गेल्या काही दिवसांपासून देशासह जगातील दिग्गज कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्यात येत आहे. अशातच मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत असताना सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपवर सध्या ‘प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजने’चा मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की, केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना’ (PM Berojgari Bhatta Yojana) अंतर्गत तरुणांना दरमहा ६००० रुपये भत्ता दिला जाणार आहे. पीएम मोदींच्या फोटोसह व्हायरल होत असलेल्या या मेसेजमध्ये योजनेच्या नोंदणीचाही दावा केला जात आहे. हा भत्ता तरुणांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी दिला जात असल्याचे मेसेजमध्ये म्हटले आहे.

(हेही वाचा – Indian Railways: रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! ‘या’ एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्यांना मिळणार FREE नाश्ता-जेवण!)

मेसेजसोबत दिलेल्या लिंकवर क्लिक करून नोंदणी करा, असे सांगण्यात आले आहे. मात्र हा व्हायरल होणारा मेसेज किती खरा आहे, याबाबत आता चर्चा सुरू आहे. दरम्यान, PIB ने ट्विट करून बेरोजगारांना सतर्क केले आहे.

तुम्हालाही असा मेसेज आला असेल तर चुकूनही लिंकवर क्लिक करू नका. या लिंकवर क्लिक करून तुम्ही फसवणुकीला बळी पडू शकता. पीआयबीने केलेल्या Fact Check मध्ये हा दावा खोटा असल्याचे आढळून आले आहे. पीआयबीने याबाबत ट्विट करून बेरोजगारांना इशारा दिला आहे. मेसेजमध्ये नोंदणी सुरू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत काही लोक चुकून या लिंकवर क्लिक करू शकतात आणि तुम्ही मोठ्या फसवणुकीला बळी पडू शकतात.

https://twitter.com/PIBFactCheck/status/1600422677457829891?s=20&t=5aaJbMy8J6qk-31c9dxjCw

व्हॉट्सअॅप किंवा सोशल मीडियावरून आलेल्या अशा कोणत्याही लिंकवर संपूर्ण माहिती मिळाल्यानंतरच त्यावर क्लिक करा. याबाबत काही शंका असल्यास सायबर सेलला कळवा. तुमची माहिती सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी तुमची आहे. तुमची प्राथमिक माहिती मिळाल्यानंतरच सायबर हॅकर्स तुमच्या गोपनीय माहितीवर हल्ला करू शकतात त्यामुळे सतर्क राहण्याचे आवाहन केंद्राकडून नागरिकांना करण्यात येत आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.