मध्य प्रदेशात ट्रेनिंग एअरक्राफ्ट कोसळून पायलटचा मृत्यू

मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मंदिराच्या शिखराला धडकून प्रशिक्षणार्थी विमानाचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये पायलट विशाल यादव यांचा मृत्यू झाला आहे. तर, इंटर्न अंशुल यादव जखमी झाला असून त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मध्यप्रदेशातील चोरहाटा पोलीस स्टेशन हद्दीतील उमरी गावात गुरुवारी रात्री 11.30 वाजता हा विमान अपघात झाला. प्रशिक्षणार्थी विमान एका मंदिराच्या शिखरावर आदळले, त्यामुळे हा अपघात झाला. विमानाला धडकताच आग लागली. या अपघातात विशाल यादव या पायलटचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर जखमी इंटर्न अंशुल यादव याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. चोरहाटा पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक अवनीश पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रीवा हवाईपट्टीचे विमानतळामध्ये रूपांतर करण्यात येत आहे. खासगी कंपनी अनेक वर्षांपासून विमान प्रशिक्षण घेत आहे. उमरी गावात विमान अपघात झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

( हेही वाचा: धक्कादायक: 200 दशलक्ष ट्वीटर युजर्सचा डेटा चोरीला; ईमेल आयडी लीक )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here