‘मी खेळायला जातो’, असं सांगून गेलेल्या चिमुरड्याचा मृतदेह टेरेसवर सापडल्याने खळबळ

109

पिंपरी चिंचवडमध्ये दोन दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या मुलाची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. आदित्य ओगले असे हत्या करण्यात आलेल्या सात वर्षांच्या मुलाचे नाव आहे. गुरुवारी आदित्यचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली होती. त्यानंतर त्याचा शोध सुरु होता. आता अचानक आदित्यचा मृतदेह आढळून आल्यामुळे सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. गुरुवारी इमारतीच्या खाली खेळत असताना आदित्य बेपत्ता झाला होता. आता दुस-या एका इमारतीच्या टेरेसवर आदित्यचा मृतदेह आढळून आला आहे. सात वर्षांच्या मुलाचा मृतदेह पाहून आदित्यच्या आईवडिलांना मोठा धक्काच बसला आहे. सध्या पिंपरी चिंचवड पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.

( हेही वाचा: उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर संजय राऊतांचे बंधू थेट दिल्लीला रवाना )

29 तासांनी सापडला मृतदेह

मी खेळायला जातो, असे सांगून आदित्य गुरुवारी घराबाहेर पडला होता. संध्याकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास आदित्य बेपत्ता झाल्याचे लक्षात आले. मुलगा कुठे आढळून न आल्याने अखेर आदित्यच्या कुटुंबीयांनी पोलीस स्थानक गाठले. आदित्य बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली.

त्यानंतर पोलिसांनी आदित्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. दरम्यान, शुक्रवारी रात्री आदित्यचा मृतदेह टेरेसवर आढळून आला आणि सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. भोसरीतील एमआयडीसीमध्ये एका इमारतीच्या
टेरेसवर सात वर्षीय आदित्यचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडली आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.