मागच्या तीन वर्षांपासून कर्करोगाशी झूंज देणारे भाजपचे पिंपरी चिंचवड विधानसेभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यांनी वयाच्या 59 व्या वर्षी अखरेचा श्वास घेतला. मागच्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्याच्या ज्युपिटर हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.
लक्ष्मण जगताप यांची पिंपरी चिंचवड शहरातील महत्त्वाचे नेते म्हणून ओळख होती. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रतिनिधित्व करण्यापासून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली होती. मनपाचे महापौरपदही त्यांनी भूषवले होते. तसेच, स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. जून 2022 रोजी मुंबई येथे राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी पुण्याहून रुग्णवाहिकेने आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार मुक्ता टिळक आल्या होत्या, त्यावेळी महाराष्ट्र भाजपने या दोघांच्याही त्याग आणि वृत्तीचे कौतुक केले होते. काही दिवसांपूर्वीच मुक्ता टिळक यांचेही निधन झाले होते. त्यानंतर महाराष्ट्र भाजपला हा दुसरा धक्का बसला आहे.
( हेही वाचा: येरवडा कारागृहात तीन कैद्यांचा मृत्यू; कारागृह प्रशासनाने सांगितले ‘हे’ कारण )
Join Our WhatsApp Community