सूर्यमालेतील सर्वात शेवटचा ग्रह नेपच्यून हा १६ सप्टेंबर रोजी पृथ्वीच्या जवळ येणार आहे. या दिवशी हा ग्रह अगदी सूर्यासमोर राहील. याला खगोल शास्त्रात प्रतियुती असे म्हणतात. प्रतियुती काळात पृथ्वीपासून ग्रहाचे अंतर सरासरी कमी असते. या काळात पृथ्वीवरुन या ग्रहाचे निरीक्षण करता येईल.
( हेही वाचा : बालवाडी शिक्षकांच्या मानधनात ३ हजारांनी वाढ, मदतनीसांना मिळणार २ हजारांची वाढ)
‘नेपच्यून’ ग्रह १६ सप्टेंबर रोजी पृथ्वीच्या जवळ येणार
सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी नेपच्यूनला १६५ वर्ष लागतात आणि स्वत:भोवती एक फेरी तो १६ तासात पूर्ण करतो. या ग्रहाचा शोध १३ सप्टेंबर १८४६ मध्ये जर्मन वैज्ञानिक गॅले आणि लव्हेरिया यांनी लावला. या ग्रहाला १३ चंद्र आहे. या ग्रहाच्या वातावरणात मिथेन असल्याने हा ग्रह निळा दिसतो. या ग्रहाचा व्यास ४८, ६०० कि.मी. आहे. या ग्रहाच्या पृष्ठभागाचे तापमान उणे २१४ अंश सेल्सिअस आहे. २४ ऑगस्ट १९८९ रोजी व्हायेजर-२ हे मानवरहित यान नेपच्यून जवळून गेले होते. सूर्यापासून या ग्रहाचे अंतर ४५२ कोटी किमी आहे. किंवा ३०.१ खगोलीय एकक आहे.१६ सप्टेंबर रोजी हा ग्रह सायंकाळी पूर्व क्षितिजावर उगवेल व पहाटे पश्चिमेकडे मावळेल. याकरता शक्तिशाली दुर्बिणीची आवश्यकता असल्याचे मराठी विज्ञान परिषद, अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरूळकर यांनी दिली.
Join Our WhatsApp Community