IRB च्या परीक्षार्थींसाठी मध्य रेल्वेकडून ‘या’ विशेष गाड्यांचे नियोजन

143

आरआरबीची परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मध्य रेल्वेने आरआरबीची परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींना प्रवासासाठी त्रास होऊ नये यासाठी विशेष ट्रेनच्या अनेक मार्गावर विशेष सेवा सोडण्यात आल्या आहेत. यामध्ये काजीपेठ ते लातूर अनारक्षित ट्रेन, कोल्हापूर ते तिरुअनंतपुरम; तर नागपूर से महगाव या विशेष ट्रेन म्हणून धावणार आहेत.

(हेही वाचा – पुलवामामध्ये लष्कराला मोठं यश, लष्कर-ए-तोयबाच्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा)

काझीपेठ ते लातूर अनारक्षित विशेष ट्रेन

०७५८६ डीईएमयू ही गाडी शनिवार रोजी (११ जून) काझीपेठ येथून सकाळी ५.१० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ८ वाजता लातूरला पोहोचेल. ०७५९१ डीईएमयू ही गाडी लातूर येथून रविवार (१२ जून) रोजी संध्याकाळी ७.३०वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवार रोजी (१३ जून) सकाळी ११.५० वाजता काझीपेठ येथे पोहोचेल. डीईएमयू ही विविध थांब्यावर थांबेल. ट्रेन सिकंदराबाद, लिंगमपल्ली, शंकरपल्ली, विकाराबाद, तंदूर, सेराम, वाडी, कलबुर्गी, सोलापूर, कुर्डुवाडी या सर्व स्थानकावर थांबेल.

कोणत्या गाड्यांचे विशेष नियोजन

  • ०६०५२ विशेष तिरुवनंतपुरम येथून १३ जून रोजी सकाळी ८ वाजता सुटेल आणि १४ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता कोल्हापूर येथे पोहोचेल.
  • ०६०५१ विशेष ट्रेन १७ जून रोजी कोल्हापूर येथून रात्री ११ वाजता सुटेल आणि १९ जून रोजी ६.४० वाजता तिरुवनंतपुरम येथे पोहोचेल.
  • यादरम्यान ही ट्रेन कोल्लम, कायनकुलम, कोट्टायम, अलप्पुज्जाह, एर्नाकुलम जं., एर्नाकुलम टाऊन, त्रिशूर, पलक्कड, कोईम्बतूर, तिरुपूर, इरोड, सेलम, सर एम विश्वेश्वरय्या टर्मिनल बेंगळूरु, बिरूर, हुबळी, बेळगावी आणि मिरज या स्थानकावर थांबणार आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.