कारगिल विजयदिनानिमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात वृक्षारोपण

कारगिल युद्धाला २३ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात मंगळवार २६ जुलै २०२२ या दिवशी स्मारक सदस्य आणि परिसरातील नागरिकांनी वृक्षारोपण केले. यावेळी अतिशय दुर्मिळ असा वरूण अथवा वायवर्ण या वृक्षाचे रोपण करण्यात आले. स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांच्याहस्ते हे वृक्षारोपण करण्यात आले तसेच अन्य उपस्थितांनीही वृक्ष रोपे लावली. या उपक्रमामध्ये स्मारक सदस्या पद्मजा सोनसुरकर तसेच सीमा खोत, शीतल वाळके, भुभाताई बांदेकर, शुभदाताई, राज, अभिषेक भाटकर, कुमारी आद्या आणि कुमार देवांश हे सुद्धा सहभागी झाले होते.

( हेही वाचा : धक्कादायक! राज्यात पाच वर्षांखालील बालकांचे सर्वाधिक मृत्यू )

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात वृक्षारोपण

वरुण अथवा वायवर्ण हे दुर्मिळ झाड असून मुंबईत त्याची केवळ दोन-तीन झाडे आहेत. वायवर्ण हा वातविकारावर गुणकारी वृक्ष असून त्याच्या पानांची भाजी करून खातात आणि फुलांचाही वापर त्यासाठी केला जातो, अशी माहिती यावेळी सोनसुरकर यांनी दिली. एप्रिल महिन्यात म्हणजे उन्हाळ्यामध्ये या वृक्षाची फुले बहरतात पिवळ्या रंगाची तुरेदार असणारी ही फुले निसर्गाची शोभाही वाढवत असतात. यावेळी अन्य काही वृक्षांचेही रोपण करण्यात आले. कारगिल विजय दिनानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात वृक्षारोपण करण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here